crime

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली असुन या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमगाव म्हाळुंगी येथील नवनाथ शिवाजी भोरडे याने शिक्रापुर पोलिस स्टेशनला एक फिर्याद दिली होती. […]

अधिक वाचा..

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर लोखंडी राँडने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.   याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान दंतोबा दंडवते याने २ मे […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले असून, दरोडेखोरांकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी टोळीप्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (वय २८, रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), प्रवीण दीपक भोसले (वय २१, रा. जातेगाव फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) […]

अधिक वाचा..
ramesh-thorat-shikrapur

शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येने उडाली खळबळ…

शिक्रापूर: शिक्रापूरचे (ता. शिरूर) माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांनी विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रमेश थोरात हे सकाळच्या सुमारास काळोखेवस्ती येथील विहिरीचे पाणी पाहून येतो, असे म्हणून घरातून मोटारीने (एमएच 12 एमयू 0052) गेले. काही वेळाने विहिरीच्या कडेला […]

अधिक वाचा..

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या दरम्यान जोगेश्वरी माता मंदिराच्या समोरील वळणाला मालवाहतूक कंटेनर व इको कारचा गाडीचा समोरासमोर झालेल्या अपघातात शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील ३५ व ३६ वयोगटातील ३ तरुणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाला आहे. याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे बालचंद्र शिवाजी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील शिंदेवाडी येथे रविवार (दि २८) रोजी खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे या स्थानिक नागरीकांमध्ये पुर्वीच्या हाणामारीच्या वादातुन अचानक भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. बैलगाडा घाटात झालेल्या मारहाणीत संजय रखमा शिंदे […]

अधिक वाचा..

भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी…

वाघोली (प्रतिनिधी) लोणीकंद-थेऊर रस्त्यावर केसनंद हद्दीत जोगेश्वरी माता मंदिराच्या जवळ मालवाहू कंटेनर आणि इको कार गाडीचा भीषण अपघात झाला असुन या अपघातात इको गाडीचा चकनाचुर झाला असून दोन जण अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असुन पाच जण जखमी आहेत. लोणीकंद पोलीस व स्थानिक नागरिकांनी एक तास अथक प्रयत्न करुन जखमींना बाहेर बाहेर काढले […]

अधिक वाचा..

शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर (ता. शिरुर) येथे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या १७ वर्षीय युवतीसोबत गेल्या तीन वर्षांपासुन मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत वारंवार तिला मानसिक त्रास देत विनयभंग केल्याप्रकरणी सलीम पप्पु शेख (वय २१) रा.शिकापुर, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.   याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

अधिक वाचा..

हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरु; वीज कर्मचारी संघटनांचा एल्गार

बारामती (प्रतिनिधी) किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा. तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. सर्व वीज उपकेंद्रांना व शाखा कार्यालयांना सुरक्षा रक्षक नेमावेत व दिवंगत रिंकू बनसोडे यांचा खटना जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघटना संयुक्त कृती समिती’ने प्रशासनाला […]

अधिक वाचा..

विजबिल जास्त आल्याने तरुणाने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत केला खुन

बारामती (प्रतिनिधी) वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका ३४ वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करुन खात्मा केल्याची घटना मोरगाव (ता. बारामती) येथे आज सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली असुन या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेला आहे. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..