रितेश खूप ओव्हररिअ‍ॅक्ट झाले; बिग बॉस मराठी 6’नंतर सोनाली राऊतची स्पष्ट प्रतिक्रिया

मुंबई: सुपर मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊत हिने ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर पडल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. शोमध्ये असताना घेतलेल्या एका निर्णयामुळे रंगलेल्या वादावर तिने आता थेट भूमिका मांडली असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांच्याबाबतही स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. टास्क नाकारल्यामुळे वादाची ठिणगी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना सोनालीने एक […]

अधिक वाचा..

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती होणार आई; जूनमध्ये बाळाच्या आगमनाची गोड बातमी

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडसह मराठी आणि हिंदी कलाविश्वात अनेक कलाकारांकडून गुडन्यूज समोर येत आहेत. अशातच आता टेलिव्हिजन विश्वातूनही एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती हिने चाहत्यांसोबत आई होणार असल्याची गोड बातमी शेअर केली आहे. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी सुरभीने तिच्या गरोदरपणाची घोषणा सोशल मीडियावर केली. ११ फेब्रुवारी रोजी तिने […]

अधिक वाचा..

विशाल निकम-अक्षया हिंदळकर विवाहबद्ध; त्रियुगीनारायण मंदिरात पार पडला डेस्टिनेशन वेडिंग सोहळा

मुंबई: गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली असून आता ‘येडं लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेता विशाल निकमही विवाहबंधनात अडकला आहे. १० फेब्रुवारी रोजी विशालने अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. दोघांची ओळख ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेतून झाली. त्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये विशालने अक्षयाचा अनेकदा “माझी सौंदर्या” असा उल्लेख केला होता. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी’मध्ये राखीचा पुन्हा धडाका! रुचिता-रोशनसोबत जोरदार वाद, घरात रंगणार हायव्होल्टेज ड्रामा

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून खेळाने वेगळीच दिशा घेतली आहे. तिच्या आगमनानंतर घरातील वातावरण अधिकच तापले असून सध्या सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान वादांचे सत्र रंगताना दिसत आहे. टास्क संपल्यानंतर राखी सावंत पुन्हा एकदा स्पर्धकांना आरसा दाखवण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्वप्रथम कपडे धुण्याच्या कारणावरून राखी आणि रुचिता यांच्यात खडाजंगी होणार आहे. “माझ्याशी […]

अधिक वाचा..

‘ठरलं तर मग’मध्ये व्हॅलेंटाईन स्पेशल! सायलीचं अर्जुनला भन्नाट सरप्राईज

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. सायली आणि अर्जुन यांनी एकमेकांच्या कामाची अदलाबदल केल्याने कथेला वेगळीच रंगत आली आहे. अर्जुन घराची जबाबदारी सांभाळताना दिसतोय, तर सायली ऑफिसमध्ये जाऊन काम करत आहे. या बदलामुळे दोघांच्या नात्यात हलकेफुलके, मजेशीर प्रसंग घडताना दिसत आहेत. सायली आता अगदी अर्जुनसारखी वागताना दिसतेय. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेचा मोठा खुलासा; पत्रकार परिषदेत मांडल्या गंभीर आरोपांची मालिका

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून बिग बॉसने दिव्याची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, घराबाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. घरातून बाहेर पडताच तिच्या […]

अधिक वाचा..

अभिनयासोबत शिक्षणाची किमया! अभिनेत्री श्रीलीलाने पूर्ण केली एमबीबीएस पदवी

मुंबई: चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार अभिनयाच्या करिअरसाठी शिक्षण अर्धवट सोडतात. मात्र काही कलाकार असेही आहेत जे ग्लॅमरसोबत शिक्षणालाही तितकंच महत्त्व देतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला. तेलुगू इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या आणि सध्या बॉलिवूडमध्येही झळकू लागलेल्या श्रीलीलाने नुकतीच एमबीबीएसची पदवी उत्तम गुणांनी पूर्ण केली आहे. सहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तिने डी. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा लव्ह अँगल! करण–प्राजक्तामध्ये वाढतंय नातं, रुचिताही भावनांमध्ये गुंतली

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर वातावरण आणखी रंगतदार झाले असून ड्रामा, वाद आणि भावना यांचा तिहेरी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बुधवारच्या भागात घरात भावनिक घडामोडी घडताना दिसल्या. रुचिताने विशालबद्दलच्या आपल्या भावना अनुश्रीसमोर व्यक्त केल्या. त्यानंतर अनुश्री आणि विशाल दोघांनीही रुचिताला समजावण्याचा प्रयत्न केला. विशालने […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६’मध्ये पहिला लव्ह अँगल? रुचिताचे विशालसाठी अश्रू; प्रेक्षकांमध्ये रंगली चर्चा

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला असून, घरातील घडामोडींनी प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती घरातील पहिल्या कथित लव्ह अँगलबाबत. या चर्चेला उधाण आले ते ‘बिग बॉस मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमुळे. या प्रोमोमध्ये रुचिताला विशालसाठी अश्रू अनावर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे […]

अधिक वाचा..

‘तारिणी’मध्ये पुन्हा अॅक्शनचा धमाका; केदारसाठी रणरागिणीचा अवतार

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ ही केवळ कौटुंबिक वाद, कट-कारस्थाने आणि भावनिक प्रसंगांसाठीच नाही, तर थरारक अॅक्शन सीक्वेन्ससाठीही ओळखली जाते. मालिकेत तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग असल्याने त्यांना विविध गुन्हेगारी प्रकरणांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मालिकेत वेळोवेळी थरारक मारामारीचे प्रसंग पाहायला मिळतात आणि अशा भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. आता पुन्हा […]

अधिक वाचा..