शिरुर तालुक्यात टेम्पोच्या धडकेत महिला मृत्युमुखी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव-बाभुळसर रस्त्यावर कारेगाववरुन बाभुसकर खुर्द कडे भरधाव वेगाने जाण्याऱ्या टेम्पोची धडक बसल्याने एक महिला मृत्यूमुखी पडली असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात संतोष दत्तात्रय वाळके (वय ४१) (रा. बाभुळसर ता. शिरूर जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असुन टेम्पो चालक भास्कर भागाजी पाडळे (रा. विघ्नहर्ता हॉस्पीटल शेजारी, मुळ रा. तर्डोबाची वाडी ता. शिरुर […]

अधिक वाचा..

जगप्रसिध्द रांजणखळगे पाहण्यास पर्यटकांची पसंती 

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे – नगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या कुकडी नदीवरील जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्रातील रांजणखळग्याचे विलोभनीय दृश्य पहाण्यासाठी आणि मळगंगा देवीच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सुट्टीच्या दिवसभरात येथे हजारो पर्यटकांनी हजेरी लावत आहे. पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) पासून 3 तर नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) पासून 4 किलोमीटर अंतरावर […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त शिरुर तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक संजय जगताप, भुमी अभिलेख अभिलेखचे अमोल […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन विविध उपक्रम राबवून साजरा 

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे स्वातंत्र्याचा वर्धापनदिन विविध नावीन्यपुर्ण उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. श्री गुरुदेव दत्त विदयालयातील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. ग्रामपंचायत कार्यालयाला समोर ध्वजारोहण सरपंच शुभांगी पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेऊन ग्रामपंचायत ने […]

अधिक वाचा..
ST

शिरूर-पूर्व भागात एसटी गाड्यांचे वाजले बारा…

मांडवगण फराटा (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील पूर्व भागात पुरेशा आणि वेळेला एसटीची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बागाईत पट्टा म्हणून ओळखला जाणारा आणि शिरूर तालुक्यातील राजकारणात गेली अनेक वर्ष आपले राजकीय अस्तित्व टिकून या भागाला सुजलाम-सुफलाम करून विकासाच्या उंचीवर पोचलेल्या वडगाव रासाई – कुरुळी- मांडवगण फराटा व तांदळी- दरम्यानच्या पुरेशा आणि […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असताना 12 दिवस उलटूनही आरोपी अ‍ॅड राहुल संभाजी झगडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याला शिक्रापुर पोलिस अटक करत नसल्याने संबंधित पिडीत महिला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलासह आत्मदहन करणार होती. याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वृत्त प्रसिद्ध […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात एका विवाहित महिलेची त्याच्यामुळे आत्महत्या, तर दुसऱ्या महिलेला आत्मदहन करण्याची वेळ…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रामलिंग येथे तीन महिन्यांपुर्वी प्रेम प्रकरणातून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी तिने सहा पानी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात ढोकसांगवी गावच्या एका ग्रामपंचायत सदस्याचे नाव होते. त्याच ग्रामपंचायत सदस्याने गावातील एका ग्रामपंचायत सदस्या असलेल्या दलित महिलेला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ती महिला रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात करणार आत्मदहन

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर येथे राहणाऱ्या एका महिलेची दौंड तालुक्यातील पेशाने वकिल असणाऱ्या व्यक्ती सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्याच मैत्रीचा फायदा घेत या वकील महाशयांनी त्या महिलेच्या घरी जाणे-येणे सुरु ठेवले. त्यानंतर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे अश्लील फोटो काढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा […]

अधिक वाचा..

रांजण खळग्यात पाय घसरुन पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर सापडला   

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी ( दि.८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून रांजणखळग्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर गुरूवारी (दि. १०) सकाळी सापडला आहे. वाशिम जिल्ह्यातील पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके शिरूर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जमिन गट नं. १२९ / २मध्ये अनाधिकृतरीत्या मुरूम उत्खनन व त्याची विक्री केली आहे. तसेच तुकडाबंदी कायदयाचे बेकायदेशीर उल्लंघन करून गुंठेवारीने विक्री करत असल्याबाबतचे पुराव्यासहित तक्रारी अर्ज शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार शिरूर यांना दिले […]

अधिक वाचा..