Shivajirao Adhalrao Patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. म्हाडाच्या पदासाठी लोकसभा सोडणाऱ्यातला मी नाही, मी शिरूर लोकसभा लढणारच, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

महायुतीकडून शिरूर लोकसभा कोण लढणार? याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन, त्यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर तर काढण्यात आलं नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून मतदारसंघात या चर्चेला उत आला आहे. मात्र या चर्चां शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खोडून काढल्या आहे. म्हाडाच्या अध्यक्षपदासाठी लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्यापैकी मी नाही, मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार देखील, असा दावा त्यांनी केला आहे.

पुणे म्हाडाच्या अध्यक्षपद दिल्यानंतर विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. आढळराव पाटील यांना जर शिरुर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी ही खेळी खेळली गेली असेल तर मग महायुतीकडून शिरूर लोकसभेच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवला जाणार? याबाबतची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची घोडेस्वारी रोखण्याचा चंग बांधलाय. तसे जाहीर आव्हानच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ‘म्हाडाचे अध्यक्षपद ही मोठी बाब आहे, असे वाटत नाही. मी करवीर नगरीत आलो आणि म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाले हा मी योगायोग समजतो. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घराची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. ही जबाबदारी चांगली पेलणार असल्याची खात्री आहे. लोकसभेच्या उमेदवारीचा आणि या म्हाडाच्या अध्यक्षपदाचा काहीही संबंध नाही. मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहणार हे ठरलं आहे. त्यात कोणातही बदल करण्यात आला नाही. आपला मतदार संघ नीट सांभाळायचा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे आणि निश्चितपणे जिंकून येणार आहे. म्हाडाच्या पदासाठी लोकसभा सोडणाऱ्यातला मी नाही.’

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…