राजकीय बळावर शेतकऱ्याच्या पिकाचे लाखोंचे नुकसान

शिरुर पंचायत समितीच्या माजी उपसभापतीचा पराक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हद्दीतील मुळे वस्ती येथील जमिनीचा दावा न्याय प्रविष्ट असताना मोजणी संबंधित शेतकऱ्यांने फेटाळली असताना देखील बेकायदेशीर पणे राजकीय बळाचा वापर करुन पोलिसांच्या समोर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे जबरदस्तीने नुकसान करत जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न नुकताच घडला असल्याने नुकसान ग्रस्त शेतकरी निलेश मुळे व […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील दलीत महिलांबाबत लज्जास्पद वृत्त छापल्याने संपादकावर गुन्हा…

शिक्रापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र क्राईम न्यूज साप्ताहिकाच्या संपादकावर गुन्हा शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील दलित महिलांबाबत अश्लील भाषा वापरत महिलांबाबत लज्जास्पद तसेच महिलांची बदनामी आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वृत्त छापल्या प्रकरणी महाराष्ट्र क्राईम न्यूज चे संपादक एकनाथ शिवराम अडसूळ यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढापुरी (ता. […]

अधिक वाचा..

ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?

शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या राजरोज पणे मोठ्या प्रमाणावर पोकलेन व ढंपरच्या सहाय्याने मुरुम ऊपसा व वाहतुक केली जात आहे. त्या शेतकऱ्याने सदरचा मुरुम उपसा व वाहतुक रोखण्याच्या प्रयत्न केला आता वाहनचालकांने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयीची तक्रार रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऐन यात्रेच्या दिवशी युवकाने पेटविला स्वतःचा बंगला व कार

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील एका युवकाने ऐन यात्रेच्या दिवशी (दि. 24) रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःची कार व बंगला पेटवून देऊन गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेल्याची घटना घडली. मात्र शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवीत बंगाल्यात कार पेटवणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती […]

अधिक वाचा..

पोलीस असल्याचे भासवत युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस पोलीसांनी ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील SBI चौकामध्ये एक मुलगी तिच्या मित्रासोबत सेल्फी काढत असताना एका व्यक्तीने त्या दोघांना आपण पोलिस असल्याचे सांगुन मला तुमची तपासणी करायची आहे असं सांगुन बंद पडलेल्या कोविड सेंटर मध्ये नेले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करत त्यांचा मोबाईल काढुन घेत मुलीचा विनयभंग करुन अंधाराचा फायदा घेत […]

अधिक वाचा..

शिरुरला पुन्हा प्रभारी तहसिलदाराची नियुक्ती; आमदार पवार उपोषण करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ला पुन्हा पुर्णवेळ तहसिलदार न देता प्रभारी तहसिलदार दिल्याने शिरूर तालुक्यामधील नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे आमदार आता ३० जानेवारीपासून याबाबत उपोषण करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक दिवसांपासून प्रभारी तहसिलदार प्रशांत पिसाळ यांच्याकडे पदभार सोपावला होता. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा मुळ चार्ज असल्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दरोडा सदृश घटनेने खळबळ

बाजारपेठेतील सोनार दांपत्याला दुकानात मारहान शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मुख्य बाजारपेठेतील एका सोनाराच्या दुकानात दाम्पत्य दुकान बंद असताना रात्री आठच्या सुमारास अचानक एका युवकाने दुकानात घुसून दांपत्याला हत्यार सारख्या वास्तूने मारहाण केल्याने खळबळ उडाली असून दरोडा सदृश घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील महेंद्र शहा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मलठण (ता. शिरुर) येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवकीनंदन शेटे, शिरुर तालुकाध्यक्ष प्रमोल कुसेकर, कार्याध्यक्ष तेजस फडके, सचिव सागर रोकडे, संपर्कप्रमुख शकील मनियार, […]

अधिक वाचा..

अज्ञात व्यक्तीने पळवून नेला अशी फिर्याद असलेला मुलगा सुखरुप घरी परतला…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील बाबुरावनगरमधील प्रज्वल गिरे या 8 वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेत पळवून नेल्याची फिर्याद त्याची आई प्रिती विनोद गिरे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. वडिलांकडे जातो, असे सांगून तो घराबाहेर गेला होता. आई रागावल्याने आईवर रुसुन तो पायी पायी पुणे -नगर रोडवडील बोऱ्हाडे मळा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अज्ञात कारणातून परप्रांतियाचा खून

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) वढू बुद्रुक रोड लगत अज्ञात कारणातून सुशांत अनिल करकरमर या परप्रांतिय इसमाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील वढू रोड लगत खराडे बिल्डींग मध्ये रफिक पठाण यांच्या खोलीत राहणारा सुशांत […]

अधिक वाचा..