ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या राजरोज पणे मोठ्या प्रमाणावर पोकलेन व ढंपरच्या सहाय्याने मुरुम ऊपसा व वाहतुक केली जात आहे. त्या शेतकऱ्याने सदरचा मुरुम उपसा व वाहतुक रोखण्याच्या प्रयत्न केला आता वाहनचालकांने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

याविषयीची तक्रार रांजणगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यासाठी शेतकरी ऋषिकेश मलगुंडे हे गेले असता पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी हा विषय बाहेरच्या बाहेर कंपनीबरोबर बसून मिटवून टाका.असे म्हणत तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली असून तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप ऋषिकेश मलगुंडे यांनी केला असुन तेथील मंडल अधिकारी यांना फोनवरून माहीती दिली असता तहसिलदारांनी पत्र दिल्यावर पाहणी करण्यास जातो. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत प्रांत आधिकारी संतोषकुमार देशमुख यांना फोनवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. या अवैध मुरुम ऊपसा प्रकरणी कंपनी प्रशासनाला कायम पाठीशी घालण्याचे काम पोलिस व तहसिल प्रशासण करत असून या बडया कंपनीवर कधी कारवाई होते कां…? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत नायब तहसिलदार स्नेहागिरीगोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अर्जदाराने सोबत जोडलेल्या प्रस्तुत अर्जाचे अवलोकन करून सदर अर्जात नमुद उपस्थित मुद्याबाबत सविस्तर सखोल चौकशी करणेत यावी. व आपले स्तरावरुन प्रस्तुत प्रकरणी योग्य ती कार्यवाही करणेत यावी. व केलेल्या कार्यवाही बाबत अर्जदारास आपले स्तरावरून कळविणेत यावे व या कार्यालयासही अवगत करावे. असा लेखी पत्र मंडल आधिकारी व रांजणगाव पोलिसांना तात्काळ दिले आहे. तसेच रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांना संपर्क साधला असता कंपनी प्रशासन आणि संबंधित शेतकरी दोघेही माझ्याकडे आले होते. परंतु त्यांनी वाद आपापसात मिटवून घेणार असल्याचे सांगितले आहे.