राजकीय बळावर शेतकऱ्याच्या पिकाचे लाखोंचे नुकसान

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर पंचायत समितीच्या माजी उपसभापतीचा पराक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हद्दीतील मुळे वस्ती येथील जमिनीचा दावा न्याय प्रविष्ट असताना मोजणी संबंधित शेतकऱ्यांने फेटाळली असताना देखील बेकायदेशीर पणे राजकीय बळाचा वापर करुन पोलिसांच्या समोर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे जबरदस्तीने नुकसान करत जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न नुकताच घडला असल्याने नुकसान ग्रस्त शेतकरी निलेश मुळे व संग्राम मुळे यांनी तक्रार पोलीस अधीक्षक पुणे तसेच शिरुर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मुळेवस्ती येथे शेतकरी निलेश मुळे व संग्राम मुळे गेली 30 वर्षांपासून शेती करत असून त्यांच्या ताब्यातील जमिनीचे बेकायदेशीर खरेदीखत झाले असल्याचा दावा न्यायालयात प्रलंबित असताना अचानक शेतजमिन मिळकतीत भुमी अभिलेख यांचे कार्यालयातून मोजणी करिता नोटीस पाठवण्यात आली.

सदरील मोजणी करिता तक्रारदारांनी भुमी अभिलेख यांचे कार्यालयात मोजणीकरिता आक्षेप घेतला मात्र तरी देखील शिरुर पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे यांनी राजकीय बळाचा वापर करून बळजबरीने संबंधित शेतकऱ्याच्या ऊस पिकांचे नुकसान केले आहे, तर विष्णु हरगुडे यांनी तेथील भुमी अभिलेख यांचे कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मोजणीकरिता नोटीस पाठवून तसेच शिकापुर पोलीस स्टेशन मधून दिशाभूल करुन नोटीस देखिल पाठविली. असा आरोप तक्रारदार मुळे यांनी केलेल्या तक्रारीत केला आहे. तर सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई होणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.