Mahaganpati

महागणपती मंदिरात मुक्तद्वार यात्रेचे आयोजन…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती मंदिरामध्ये रविवारपासून (ता. २८) साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाद्रपद गणेशोत्सवाची तयारी चालू आहे. महागणपती मंदिरात रविवार (ता. २८) ते बुधवार (ता. ३१) मुक्तद्वार यात्रेचे आयोजन केले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती देवस्थानने दिली. श्री […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऑनलाईन अश्लील चॅटिंगमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड

शिरुर (तेजस फडके) सध्याच्या युगात माणुस दिवसभर उपाशी राहील. पण दिवसभर मोबाईलशिवाय राहू शकत नाही. तसेच मोबाईल हि हौस नसुन गरज झाली आहे. आज लहान मुलांपासुन वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागलं आहे. त्यात तरुणपिढी तर या सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असते. परंतु मोबाईलचे काही फिचर माहित नसल्याने किंवा चुकीचे अँप वापरुन ऑनलाईन व्हिडीओ सेक्स […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पिंपळे जगतापला कंपनीतील दहा लाखांचा माल चोरणारे जेरबंद

शिक्रापुर (शेरखान शेख) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील एका कंपनीतील फोर्जिंगचे महागडे दहा लाखांचे जॉब चोरुन विक्री करणाऱ्या सुरक्षा रक्षकासह भंगार खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून सागर राजेंद्र जाधव, योगेश प्रल्हाद काकपुरे, अशोक बाळू काळे व अब्दुलगफूर आदम शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपळे जगताप येथे […]

अधिक वाचा..

यंदाचा गणेशोत्सव निर्भयपणे साजरा करा:- यशवंत गवारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव MIDC हद्दीतील गावांच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गावातील पदाधिकारी तसेच पोलीस पाटलांची आज (दि 23) रोजी शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना यशवंत गवारी म्हणाले, गणेशोत्सव साजरा […]

अधिक वाचा..

करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी अवतरले नागराज

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे गावात आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त भैरवनाथ मंदिरा समोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ आज सायंकाळी सहाच्या सुमारास नागराजांनी दर्शन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी लांबूनच मोठ्या मनोभावे नागराजांचे दर्शन घेतले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा पोलिसांनी दरोडा, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

श्रीगोंदा: घरफोडी, दरोडा अशा विविध गुन्ह्यात गेली एक ते दिड वर्ष फरार असलेला तसेच वेषांतर करुन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी रविवार (दि 21) रोजी सकाळी कोंबिंग ऑपरेशन करत अटक केली असुन संदेश उर्फ दौल्या संजय भोसले (वय 24) रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन त्याच्यावर अहमदनगर […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव पोलिसांनी त्या “पाच” जणांचा बळी घेणाऱ्या कंटेनर चालकास ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर एल जी कंपनीसमोर असणाऱ्या हॉटेल एस नाईन हॉटेल जवळ बुधवार (दि १७) रोजी मध्यरात्री १:३० च्या सुमारास अहमदनगरकडुन-पुण्याकडे चारचाकी इको गाडीला रांजणगावकडुन कारेगावकडे विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेंनरची धडक बसुन झालेल्या गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर कंटेंनर चालक पळुन गेला होता. परंतु […]

अधिक वाचा..

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

पुणे: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे सांगत एका मांत्रिकाने त्या मुलीलाच जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला होता. यावरुन पालकांनी आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे […]

अधिक वाचा..

पोलिस आणि पत्रकारांचे विशेष मुलांसोबत अनोखे रक्षाबंधन 

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील पोलिस आणि पत्रकार यांनी विशेष मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांच्या मुलांच्या हस्ते राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही विशेष मुलांची संस्था गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे.या वर्षी पोलिस व पत्रकार यांचा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत […]

अधिक वाचा..
RANJANGAON

कल्याणी टेक्नोफोर्स लि कंपनीतील चोरी प्रकरणी सिक्युरीटीसह दोन आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड कंपनीतील 98 हजार 960 रुपयांच्या डाय चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे डेप्युटी मॅनेजर सचिन पंढरीनाथ गायकवाड यांनी यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेत चोरी करणाऱ्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..