श्रीगोंदा पोलिसांनी दरोडा, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

मुख्य बातम्या

श्रीगोंदा: घरफोडी, दरोडा अशा विविध गुन्ह्यात गेली एक ते दिड वर्ष फरार असलेला तसेच वेषांतर करुन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी रविवार (दि 21) रोजी सकाळी कोंबिंग ऑपरेशन करत अटक केली असुन संदेश उर्फ दौल्या संजय भोसले (वय 24) रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन त्याच्यावर अहमदनगर जिल्ह्यात सुपा, बेलवंडी, श्रीगोंदा तसेच नाशिक जिल्ह्यात चांदवड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हे दाखल आहेत.

श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना दरोडा, घरफोड्या करणारा सराईत फरार आरोपी संदेश ऊर्फ दौल्या भोसले हा कोळगाव शिवारात आल्याची खात्रीलायक माहीतीमिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे कोंबिंग ऑपरेशन करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी रविवार (दि 21) रोजी सकाळी कोंबिंग ऑपरेशन करत संदेश उर्फ दौल्या भोसले याला ताब्यात घेतले. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो दीड-दोन वर्षापासुन वेशांतर करुन पोलीसांना चकवा देत होता. तसेच अनेक गुन्ह्यात तो फरार आरोपी आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, सहायक फौजदार अंकुश ढवळे (SDPO) पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहीदास झुंजार, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर यांनी केली आहे. या आरोपीकडुन आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन या गुन्ह्याचा पुढील तपास रोहीदास झुंजार हे करत आहेत