कृषी-विपणनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य गरजेचे; मंत्री जयकुमार रावल

मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या परिसंवादात ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची प्रभावी मांडणी मुंबई: कृषी व विपणन व्यवस्थेचा वेगवान विकास साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. फिलिपाईन्समधील मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या कृषी […]

अधिक वाचा..

गुढीपाडव्याला ठाण्यात देवीची प्राणप्रतिष्ठा; उपमुख्यमंत्री शिंदे यांची सहकुटुंब पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचे सहकुटुंब विधिवत पूजन करून देवीची प्राणप्रतिष्ठा केली.ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्थापना करण्यात आली असून पुढील नऊ दिवस येथे विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]

अधिक वाचा..

गुढी पाडव्यादिवशी कांद्याची आवक घटली; दरात चढ-उतार, काही बाजारात लिलाव बंद

मुंबई: राज्यात गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि. १९ मार्च) रोजी कांदाबाजारात एकूण ४५,३२९ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. यामध्ये लाल, लोकल, पोळ, उन्हाळी तसेच विविध प्रतिच्या कांद्यांचा समावेश होता. मात्र, अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने एकूण आवक तुलनेने कमी दिसून आली. लोकल कांद्याला सर्वाधिक आवक असलेल्या पुणे बाजारात किमान ४०० तर सरासरी ८५० रुपये […]

अधिक वाचा..

भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

मुंबई: ज्योतिष व तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरात मुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणावरून राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकर यांची ठाम बाजू […]

अधिक वाचा..

खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत खरातला थेट आसाराम बापू आणि गुरमीत राम रहिम सिंह यांच्यासारखा संबोधले. महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास “५८ नव्हे तर शेकडो व्हिडिओ समोर येतील,” असा गंभीर दावा त्यांनी केला.गांधी भवन येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा […]

अधिक वाचा..

जुनी वाहने महाग! पर्यावरण करात दुप्पट वाढ; मोटार वाहन कर सुधारणा विधेयक २०२६ मंजूर

मुंबई: राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे “महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६” विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात मोठी वाढ करण्यात आली आहे. नवीन दरांनुसार दुचाकी वाहनांसाठी कर ₹२,००० […]

अधिक वाचा..

धर्मांतरावर कडक लगाम! २००४चा मुद्दा पुन्हा तापला

मुंबई: राज्यात आमिष दाखवून किंवा सक्तीने होणाऱ्या धर्मांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आज विधानपरिषदेत यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक मांडण्यात आले. या चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २००४ साली मांडलेल्या अशासकीय विधेयकाचा संदर्भ विशेष ठरला. तसेच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या भूमिकेचीही आठवण करून देण्यात आली. २००४ च्या हिवाळी अधिवेशनात डॉ. गोऱ्हे यांनी […]

अधिक वाचा..

भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; टिळक भवनात शक्तिप्रदर्शन

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे विविध पक्ष व संघटनांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास वाढत […]

अधिक वाचा..

युद्धाचा परिणाम! गॅस सिलिंडर महाग; सरकारने बदलले एलपीजीचे ५ नियम

मुंबई: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभर दिसून येत असून त्याचा फटका भारतालाही बसू लागला आहे. देशात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी गॅस वितरणातही उशीर होत आहे. त्यामुळे गॅससाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावा आणि […]

अधिक वाचा..

निधी वाटपात पक्षपातीपणा; आदिवासी निधी वळवण्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

मुंबई: राज्यातील महायुती सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून अर्थसंकल्पातील निधी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा फक्त घोषणेतच राहिली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी […]

अधिक वाचा..