आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा; महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवणार; एकनाथ शिंदे

मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवत आहोत,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील १२४ नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये आणि उन्नतीकरण झालेल्या आरोग्य सुविधांचे ऑनलाईन […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील 10 प्रमुख MIDC; पुणे ठरतेय औद्योगिक केंद्र, उद्योजकांच्या स्थलांतराने राजकारण तापले

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा विचार केला तर पुणे जिल्ह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुण्याला राज्याचे ‘ऑटो हब’ म्हणूनही ओळखले जाते. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील विविध अडचणी आणि समस्यांमुळे काही उद्योजक पुण्यातून इतर ठिकाणी स्थलांतर करत असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील औद्योगिक विकास आणि MIDC क्षेत्रांबाबत राजकीय वातावरणही तापले आहे. महाराष्ट्रात केवळ […]

अधिक वाचा..

सलग 25 वेळा तिरंगा फडकावत मोदींच्या नावावर नवा विक्रम; विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’चा संकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा सुमारे 25 वर्षांचा प्रशासकीय प्रवास पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मोदी यांनी आज देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 13व्यांदा तिरंगा फडकावला. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 12 वेळा राज्यस्तरीय […]

अधिक वाचा..

२ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर होणार; ‘आधी मोजणी, मग रजिस्ट्री’ची नवी व्यवस्था

मुंबई : जमिनीवर प्रत्यक्ष वहिवाट आणि ताबा असतानाही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या राज्यातील सुमारे २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून आढावा घेऊन पुढील तीन महिन्यांत आवश्यक सॉफ्टवेअर आणि कार्यपद्धती विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील वनहक्क मिळालेल्या आदिवासी शेतकऱ्यांपैकी सुमारे […]

अधिक वाचा..

सरकार कुणाचेही असो, रामदास आठवले यांचे मंत्रीपद निश्चित? फडणवीसांनी आठवलेंच्या शैलीत सादर केली कविता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे तिकीट किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक नेते पक्ष बदलताना दिसतात. मात्र, या सगळ्याला अपवाद ठरलेले एक नाव म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले. त्यांच्या पक्षाचा सध्या लोकसभेत एकही खासदार किंवा महाराष्ट्र विधानसभेत एकही आमदार नसतानाही आठवले गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात मंत्री […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यदिनी शिवसेनेला मोठा धक्का; नर्मदाताई वैतींसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

मिरा-भाईंदर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांनी शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सुर्वे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नर्मदाताई वैती यांचा मिरा-भाईंदरच्या राजकारणात […]

अधिक वाचा..

मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते; सोनिया गांधींचीही परवानगी, पण मनमोहन सिंगांच्या भूमिकेमुळे प्रवेश रखडला

मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंडे व काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या, असा दावा चव्हाण यांनी केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंडे यांनी मंत्रीपदाची अट ठेवली होती. […]

अधिक वाचा..

बीडमध्ये धक्कादायक प्रकार; विलास घुले यांच्या पत्नीने वृत्तवाहिनीसमोरच केले विषप्राशन

बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याची चौकशी करून त्याला अटक करावी, या मागणीसाठी घुले कुटुंबीय मागील दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार […]

अधिक वाचा..

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला राहुल गांधी, खर्गेंची दांडी; बैठक व्यवस्थेवर नाराजी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. या राष्ट्रीय सोहळ्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, दोन्ही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. काँग्रेसच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला गैरहजर […]

अधिक वाचा..

चाकणसाठी स्वतंत्र औद्योगिक नगरी; फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या परिसरातील वाढते औद्योगिकीकरण तसेच पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेऊन या भागासाठी स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ‘औद्योगिक नगरी’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चाकण परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने उद्योगांनी स्थलांतराचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे चाकणमधील उद्योगांना मोठा दिलासा मिळाला […]

अधिक वाचा..