Blinkitच्या मालाड गोदामावर FDAचा दणका! झुरळांचा सुळसुळाट, मुदतबाह्य अन्नसाठा;

मुंबई : मालाड परिसरातील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Blinkit) च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. ७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या अचानक तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने गोदामाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. FDA अधिकाऱ्यांच्या तपासणीत फळे आणि भाजीपाला साठवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुरळांचा वावर […]

अधिक वाचा..

दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; अटकेचा आकडा २४ वर, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पुतण्याचे नाव समोर

मुंबई राज्यातील दूध भेसळ करणाऱ्या टोळीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या प्रकरणात आणखी १० जणांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण अटकेचा आकडा आता २४ वर पोहोचला आहे. ४ जुलै रोजी पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करत दूध भेसळीच्या रॅकेटचा […]

अधिक वाचा..

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कारभारावर अमोल मातेले संतापले; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही

मुंबई: महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण व्यवस्थेचा कारभार ढिसाळ झाल्याचा आरोप करत ॲड. अमोल मातेले यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असल्याचा दावा करत त्यांनी थेट ईमेलद्वारे शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून जाब विचारला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) […]

अधिक वाचा..

मनपातील १० वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवेत सामावून घेण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

ठाणे: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार ही पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज यांना दिल्या. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील एकूण १,१९८ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सांगलीचे […]

अधिक वाचा..

ठाण्यातील म्हाडाच्या घरांच्या किमतीत मोठा दिलासा; २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसारच किंमत

ठाणे: ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसारच घरांची किंमत निश्चित करण्याचे आदेश त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पात एकूण १,१७३ घरे उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी […]

अधिक वाचा..

आमदार सचिन कल्याणशेट्टींना गोळ्या घालण्याची ऑफर? चालकाला दाखवले पैशांचे आमिष

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदारांना गोळ्या झाडून ठार करण्यासाठी चालकाला थेट ऑफर देण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी सोलापूर शहरातील […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा ₹1500 हप्ता कधी मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ दिला जातो. जुलै महिन्याच्या हप्त्याची अनेक महिला प्रतीक्षा करत असून, हा हप्ता १५ ऑगस्टपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या निधीचे थेट हस्तांतरण […]

अधिक वाचा..

ड्रग्सच्या शोधात पोलिसांचा छापा; २० पोत्यांत तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा सापडला!

पुणे : काकडेवस्ती परिसरात खासगी ट्रॅव्हल्समधून अमली पदार्थांचा साठा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी छापा टाकला. मात्र, पोलिसांच्या हाती ड्रग्सऐवजी तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे २० पोत्यांमध्ये खवा आढळून आला. हा खवा नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा वापर कुठे आणि कशासाठी […]

अधिक वाचा..

‘१९ गुन्हे दाखल असलेला माणूस मंत्री कसा?’; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर घणाघात

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. गोरे यांच्यावर सुमारे १९ गुन्हे दाखल असल्याचा दावा करत, “एखाद्यावर चार-पाच गुन्हे दाखल झाले तर मोक्काची कारवाई होते. मग दाखल गुन्हे पाहता मोक्काची कारवाई होऊ नये म्हणून गोरे भाजपमध्ये दाखल झाले का?” असा […]

अधिक वाचा..

चाकण MIDCला मोठा धक्का? 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत

चाकण : मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान निर्माण केलेल्या चाकण MIDCसमोर आता पायाभूत सुविधांचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. खराब रस्ते, खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी, अपघात तसेच पाणी आणि वीजपुरवठ्याच्या तक्रारींमुळे चाकणमधील सुमारे 20 लघुउद्योगांनी स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.या कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDCमध्ये […]

अधिक वाचा..