लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन होताच स्थानिक मराठी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ तसेच ‘लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाचा विजय असो’ अशा घोषणांनी हिथ्रो विमानतळ परिसर दणाणून गेला. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या […]

अधिक वाचा..

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या ३५ ते ४० दिवसांपासून पाऊस झालेला नाही. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती असून ८३ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळे शक्तिपीठासारखे इतर विषय बाजूला ठेवून सरकारने सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारने […]

अधिक वाचा..

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांचा तीन पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आज लंडनला रवाना झाले. ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप […]

अधिक वाचा..

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह जिहाद’ होऊ नये, यासाठी मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या भूमिकेला विरोध करत सर्वसमावेशकतेची भूमिका मांडली. “आपला […]

अधिक वाचा..

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि हातकागद संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘Paint Your Own Paper Mache Bappa’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कार्यशाळेला भेट देत हातकागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तीला नैसर्गिक रंगांनी […]

अधिक वाचा..

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष समानतेचा आणि संविधानाचा आहे. हा काँग्रेसचा विचार आहे. तर दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा आणि राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हातात असावी, असा विचार भाजप आणि आरएसएसचा आहे. हा फॅसिस्ट विचार देशासाठी आणि जगासाठी अत्यंत घातक असून, देशाला या विचारापासून वाचवण्यासाठी संविधानाचे […]

अधिक वाचा..

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूक करण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी राज्यातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेणार […]

अधिक वाचा..

अकरावीचे ऑफलाईन प्रवेश करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा

मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेणे किंवा ऑफलाईन पद्धतीने अनधिकृत प्रवेश देणे महाविद्यालयांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा प्रकारचे प्रवेश आढळल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालय आणि मुख्याध्यापकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. शालेय […]

अधिक वाचा..

खासगी शिकवणी केंद्रांच्या कायद्याला १५ सप्टेंबरपर्यंत हरकतींची मुदतवाढ; आतापर्यंत ११ हजारांहून अधिक सूचना

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अभिप्राय प्राप्त होत असल्याने सूचना व हरकती सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शिक्षण संचालक (माध्यमिक) यांनी याबाबत माहिती दिली. शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ चा मसुदा मराठी […]

अधिक वाचा..

गणेशोत्सव केवळ आरास-रोषणाईपुरता नको; समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे; एकनाथ शिंदे

ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. कार्यकर्त्यांनी गेल्या ३७ वर्षांपासून ही परंपरा सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे गणेश दर्शन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राम […]

अधिक वाचा..