एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या अहवालावर आधारित विधेयक २९ एप्रिलपूर्वी मंजूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार का करत आहे, असा सवाल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजांना यथायोग्य प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था असताना, घाईगडबडीत […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. भरोसा सेल, कौटुंबिक संरक्षण अधिकारी आणि समुपदेशन केंद्र यांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure) तयार करण्याच्या सूचना […]

अधिक वाचा..

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर एक कलाकार दिसतो, पण खरी पटकथा कुणी लिहिली आहे, हे रसिकांना कळत नाही. आणि या नाटकाचा खरा दिग्दर्शक कोण असेल, तर तो म्हणजे विनोद तावडे! राजकारणात अनेक जण “मी, मी” करत फिरतात, पण काही जण “काम, काम” करत इतिहास घडवतात. […]

अधिक वाचा..

मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा २० आणि २१ एप्रिल २०२६ रोजी बोरीवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार ठाकरे (जयवंत दळवी लघु नाट्यगृह) येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्र शासनाचे […]

अधिक वाचा..

आशाताईंनी स्वर समाधी घेतली! चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहोत; एकनाथ शिंदे

मुंबई: ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे कुठल्याही फूटपट्टीने मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचे निधन नाही तर त्यांनी स्वर समाधी घेतली, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्यात रस्ते अपघात व त्यातील बळींची संख्या उच्चांकी पातळीवर

मुंबई: राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणा-या नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची व बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाच्या कारभारावर काँग्रेसचा हल्ला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने परिवहन विभागावर जोरदार टीका करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत निवेदन जारी करून राज्य सरकार रस्ता सुरक्षेबाबत पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड–कल्याण मार्गावरील इको कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांना काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. […]

अधिक वाचा..

कवठे येमाईत एकाच घटनेचे दोन पैलू

मारहाण आणि विनयभंगाच्या परस्पर तक्रारींनी प्रकरण तापले शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात ३ एप्रिल रोजी घडलेल्या एका घटनेने अनपेक्षित वळण घेतले असून, त्याच घटनेतून मारहाण आणि विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. पोलिसांसमोर नेमका घटनाक्रम उलगडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, या घटनेची सुरुवात किरकोळ वादातून […]

अधिक वाचा..

भारतीय संगीतविश्वातील जादुई आवाज हरपला

मुंबई: भारतीय संगीत क्षेत्राला अजरामर करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात मंत्री भोंसले म्हणाले की, आशा भोसले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि जादुई गायनशैलीने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांमधील हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध […]

अधिक वाचा..

शिवसेना हे कुटुंब, आपापसातील कुरबुरी आणि मतभेद दूर करून एकसंघ व्हा

धाराशिव: शिवसेना हे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये काही कुरबुरी असतील काही मतभेद असतील ते दूर करा आणि एकसंघ व्हा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथे बोलताना केले. धाराशिवमधील भव्य नागरी सत्कार सोहळ्यातून कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. “शिवसेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधून टाकली होती… ती वाचवण्यासाठीच आम्हाला उठाव करावा लागला!” असा जोरदार […]

अधिक वाचा..