शिरुर तालुक्यात रांजणगाव गणपती येथे आढळला दहा फुटी अजगर 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): रांजणगाव गणपती येथील देवाचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार शेळके हे घरी जात असताना त्यांच्या वस्तीच्या शेजारुन एक भला मोठा साप रस्त्यावरून घरांकडे जाताना त्यांना दिसला. त्यांनंतर त्यांनी तातडीने नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष रामेश्वर ढाकणे यांना त्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात रामेश्वर ढाकणे, सर्पमित्र गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, रोहित मुळे, राहुल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील शालिरेक्स कंपनीला सामाजिक कार्यकर्ते तेजस यादव यांच्यामुळे दणका…

शिरुर (तेजस फडके): पुणे प्रदुषण नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पुणे-नगर महामार्गालगत सणसवाडी येथील शालिरेक्स पॉलीव्हीनाईल प्रा. लि. कंपनीचे उत्पादन ४८ तासात बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने (MPCB) दिले आहेत. या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर वायु प्रदुषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी MPCB ने केलेल्या स्थळ पाहणीत कंपनीने अनेक पर्यावरण कायद्याचा भंग केला […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमा येथे मध्यरात्री स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात दोन तरुण जखमी 

शिरुर (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील भीमानदीच्या पुलावरील उजव्या बाजूकडील वळणावर पहाटे तीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे-नगर महामार्गापासून गाडी साधारणतः पन्नास ते साठ फूट खाली खड्ड्यात वेगाने पलटी झाली. यावेळी एअर बॅग ओपन झाल्याने गाडीतील दोन तरुणांचे प्राण वाचले मात्र अपघातात हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असुन त्या तरुणांना […]

अधिक वाचा..

निर्वीच्या लेकीचा MPSC परिक्षेत डंका, पोलिस उपनिरिक्षक पदी निवड, गावात मिरवणुक काढुन नागरी सत्कार

भाग्यश्रीने उंच भरारी घेवुन जिवनाच सोन केले-वडिलांची प्रतिक्रिया शिरुर (तेजस फडके): निर्वी( ता शिरुर) येथील भुमीपुञ नंदकुमार पांडुरंग शहाणे यांची कन्या भाग्यश्री नंदकुमार शहाणे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये गरूड भरारी झेप घेवुन पोलिस उपनिरिक्षक या पदावर बाजी मारून निर्वी गावासह आपल्या कुटुंबाचे नाव प्रसिध्द करून उंच केले आहे.या निवडीबद्दल भाग्यश्री शहाणे हिचे […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पोलिस निरीक्षकपदी संजय जगताप, चार्ज घेताच रुट मार्च करुन पेट्रोलिंग सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या बदलीनंतर पोलिस निरीक्षकपदी संजय जगताप यांची वर्णी लागली आहे. शिरूर पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस ऊपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार व 20 पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन त्यांनी […]

अधिक वाचा..
jategaon school

शिरूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानी…

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक ) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. राज्यातील सर्वाधीक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यात शिरूर तालुका अव्वलस्थानी असल्याची माहिती शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १२ फेब्रुवारी २०२३ […]

अधिक वाचा..

राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपसोबत जाणार नाहीत; भाई जयंत पाटील

शिरुर (तेजस फडके): पुण्यातील अल्पबचत भवन येथे नुकतेच प्रागतिक पक्षांचे दोन दिवसीय सत्ता परीवर्तन शिबिर संपन्न झाले. यावेळी शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर महाराष्ट्र, स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा लिब्रेशन पार्टी, रिपाई […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात नवनियुक्त PI महेश ढवान यांनी पदभार स्वीकारला; स्वागताला “तो” हजर 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील अनेक पोलिस निरीक्षकांच्या काल (दि 13) रोजी कार्यकाल पुर्ण झाल्याने बदल्या झाल्या रांजणगाव MIDC चे तत्कालीन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांचा कार्यकाल पुर्ण झाल्याने त्यांची मंचर पोलिस स्टेशन येथे बदली झाली. तर त्यांच्या जागी महेश ढवन यांनी आज(दि 14) रोजी रांजणगाव MIDC चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक म्हणुन पदभार स्वीकारला. […]

अधिक वाचा..

निमगाव दुडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

शिरुर (अरुणकुमार मोटे): निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे सचिन बाबाजी गोरडे यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तीला ठार केल्याची घटना बुधवार (दि. १२) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. सचिन बाबाजी गोरडे यांच्या घराजवळ रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंगणात बांधलेल्या कालवडीवर अचानक हल्ला करून ठार केले. इतर जनावरे ओरडल्याचा आवाज आल्यावर गोरडे कुटुंबीय जागे […]

अधिक वाचा..

आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्पूर्वीचे उपसरपंच कांताराम नऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते. यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेतून एकमेव प्रदिप साळवे यांचे नामनिर्देशन अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच लीला पवार यांनी काम […]

अधिक वाचा..