शिरुरच्या पोलिस निरीक्षकपदी संजय जगताप, चार्ज घेताच रुट मार्च करुन पेट्रोलिंग सुरु

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या बदलीनंतर पोलिस निरीक्षकपदी संजय जगताप यांची वर्णी लागली आहे.

शिरूर पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस ऊपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार व 20 पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन त्यांनी शिरूर शहरामधील प्रमुख बाजारपेठ, पाचकंदील चौक, डंबेनाला, मुंबई बाजार, मार्केट यार्ड, बस स्थानक येथे रूट मार्च करून पेट्रोलिंग केली व याच प्रकारे दरदिवशी शिरूर शहरामध्ये, बाबुरावनगर शिरूर ग्रामीण या ठिकाणी पायी पेट्रोलिंग केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राऊत यांच्या कार्यकाळात शिरूर शहरासह पोलिस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, दरोडा, शेतकर्यांचे कृषी पंप, केबल चोरी, देवाचे दागीने चोरी, खुण, असे अनेक गुन्हे घडले असून त्या गुन्ह्यांची अदयापही ऊकल झाली नाही. पुर्व भागात निमोणे येथे वृध्दाचा खुन, एका कामगाराची आत्महत्या तसेच बेबारस मृतदेह, तसेच महिलेची आत्महत्या आदी गंभीर प्रकरणे उघडकीस आली नसून या घटनांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या पुढे आहे.

शहरासह तालुक्यात जुगार, मटका, गुटखा विक्री, अवैध दारु, गांजा विक्री तसेच गॅस रिफिलींग व्यवसाय जोमात सुरु असून त्यांना आवर घालणार घालण्यास प्रयत्न होणार का? राऊत यांच्या कार्यकाळातील गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या पुढे उभे ठाकले असून राऊत यांच्या कार्यकाळात अनेक कर्मचारी त्यांच्यावर नाराज होते. त्याचा परीणाम तपास यंत्रणेवर होत होता. निरोप समारंभातही त्यांनी आधिकारी, कर्मचारी यांनी तपासात मदत न केल्याचे बोलून दाखवले होते. शिरूरच्या गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून शिरूरकरांना जगतापसाहेबांकडून दबंग कामगिरीची अपेक्षा आहे.