निर्वीच्या लेकीचा MPSC परिक्षेत डंका, पोलिस उपनिरिक्षक पदी निवड, गावात मिरवणुक काढुन नागरी सत्कार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

भाग्यश्रीने उंच भरारी घेवुन जिवनाच सोन केले-वडिलांची प्रतिक्रिया

शिरुर (तेजस फडके): निर्वी( ता शिरुर) येथील भुमीपुञ नंदकुमार पांडुरंग शहाणे यांची कन्या भाग्यश्री नंदकुमार शहाणे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये गरूड भरारी झेप घेवुन पोलिस उपनिरिक्षक या पदावर बाजी मारून निर्वी गावासह आपल्या कुटुंबाचे नाव प्रसिध्द करून उंच केले आहे.या निवडीबद्दल भाग्यश्री शहाणे हिचे निर्वी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

भाग्यश्री शहाणे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्वी या ठिकाणी झाले. तर माध्यमिक शिक्षण शिक्रापूर या ठिकाणी झाले आहे व त्यापुढील शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी पूर्ण केले. यावेळी एसटी स्टँड ते गावातील पेठांमधून मारुती मंदिरापर्यंत ढोल ताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच एकमेकांना पेढे भरून अभिनंदन करण्यात आले. निर्वी परिसरातील ग्रामस्थांनी परिसरातील मित्रपरिवार व नागरिकांनी तिच्या या यशाचे कौतुक केले. या प्रसंगी जि.प.प्रा.शाळा निर्वी यांच्यावतीने भागश्रीचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार सोनवणे यांनी केले. यावेळी पीएसआय भाग्यश्री शहाणे हिचे विविध क्षेञातील मान्यवरांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल वाबळे, श्रीपाद ज्वेलर्सचे मालक कमलेश बु-हाडे, माजी उपसरपंच निलेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, भाग्यश्री बु-हाडे, भाऊसाहेब सोनवणे, बंडू सोनवणे, पोपटराव पवार, मानसिंग पवार, योगेश सोनवणे, पत्रकार नंदकुमार शहाणे, लक्ष्मण शहाणे , संभाजी शहाणे आदी मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातून बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी तात्या शहाणे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.

भाग्यश्री शहाणे हिने सत्काराला उत्तर देताना सांगितले आहे की मी आज जे यश प्राप्त केले आहे ते सर्व माझ्या आजी आजोबा, आई वडील, गुरूजन वर्ग मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ यांच्या आर्शिवादाने आहे.मला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मी या पदावरती पोहचले आहे.सगळ्यांना मनापासुन धन्यवाद देऊन सगळ्यांचे आभार मानले आहे.

भाग्यश्री शहाणे

(पोलिस उपनिरीक्षक)