jategaon school

शिरूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानी…

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक ) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. राज्यातील सर्वाधीक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यात शिरूर तालुका अव्वलस्थानी असल्याची माहिती शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली.

परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली. ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) शिरूर तालुक्यातून ३८४४ विद्यार्थी बसले त्यापैकी १९६३ विद्यार्थी पात्र ठरले. ३५६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले असून शेकडा निकाल ५१.६% असा लागला आहे. राज्य गुणवत्ता यादीत ५ वी परीक्षेत १७ विद्यार्थी झळकले आहेत. तसेच इयत्ता ८ वी ( पूर्व माध्यमिक ) परीक्षेस २२०९ विद्यार्थी बसले त्यापैकी ८४१ विद्यार्थी पात्र ठरले तर २५२ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले असून शेकडा निकाल ३८ . ०७%असा लागला आहे. राज्य गुणवत्ता यादीत ८ वी परीक्षेत १६ विद्यार्थी यशवंत ठरले आहेत.

जातेगावच्या संभाजीराजे विद्यालयाचे ९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर ) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे ९ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या वर्गास शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. सदर परीक्षेत एकूण ३९ विद्यार्थी बसले पैकी १६विद्यार्थी पात्र ठरले व ९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. विद्यालयाचा एकूण निकाल ४१.०३ %असा लागला आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे –
आकांक्षा संदीप इंगवले – २४०
वेदांत सुनील उमाप – २२०
प्रिया महेश आरवडे – २१८
ऋग्वेद पुरुषोत्तम नरवडे – २०८
प्रांजल देवराम चोरमले – २०८
तनिष्का मोहन क्षीरसागर – २०४
रिद्धी लक्ष्मण पोतले – १९६
करण संतोष वारे – १९२

विद्यार्थ्यांना रामदास थिटे, शंकर भुजबळ, रमेश जाधव ,कांतीलाल धुमाळ, अनिता लंघे, प्रिया उमाप यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष सुगंध उमाप, उपाध्यक्ष कांतीलाल उमाप, सचिव प्रकाश पवार यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रिय लोकसेवा आयोग परीक्षेतही प्रशासनात शिरूर तालुक्याचे स्थान अव्वल असून शिष्यवृत्ती परीक्षेतही शिरुरचा ‘शिष्यवृत्ती पॅटर्न’ विशेष उल्लेखनिय आहे. शिष्यवृत्तीच्या यशामुळे प्रशासनात यशस्वी होण्याचे विद्यार्थी संख्येचे प्रमाण वाढते आहे.
– प्राचार्य रामदास थिटे