करंदी ग्रामपंचायत इमारतीची नऊ वर्षातच दुरवस्था

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारतीला नऊ वर्षे पूर्ण झालेले असताना सदर इमारतीची दुरवस्था होऊ लागल्याचे दिसत असल्याने तत्कालीन ठेकेदाराने नित्कृष्ठ दर्जाचे काम केलेले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. करंदी (ता. शिरुर) येथे सन २०१३ साली ग्रामपंचायत निधी व जिल्हा ग्रामविकास निधी कर्ज निधीतून ग्रामपंचायत इमारत […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या तेवीस खेळाडूंचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या तब्बल 23 खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मधिल तायक्वांदो खेळामध्ये घवघवीत यश संपादित केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया […]

अधिक वाचा..

पारोडीमध्ये आढळलेल्या जखमी कोल्ह्याला जीवदान

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथील सातकर वाडी येथे आढळून आलेल्या जखमी अवस्थेतील कोल्ह्याला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले असून सदर कोल्ह्याला पुढील उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पारोडी (ता. शिरुर) येथील सातकरवाडी मधील सुरेश सातकर यांच्या शेतात आज सकाळच्या सुमारास एक कोल्हा जखमी अवस्थेत बसला असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी याबाबतची माहिती इंडिया […]

अधिक वाचा..
mahesh dhamdhere

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

न्हावरे (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असे अशी घणाघाती टिका विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केली आहे. ‘गेल्या 25 वर्षात घोडगंगा सहकारी कारखान्यात केलेली लूट लोकांना कळू नये तसेच स्वतःच पाप झाकण्यासाठी विद्यमान अध्यक्ष अशोक पवार यांनी सर्वसाधारण सभेत सभासदांचा आवाज दाबला. त्यामुळे हा कारखाना वाचला […]

अधिक वाचा..
ration shop

शिरूर तालुक्यात महिना संपला तरी रेशन धान्य वाटप नाही; भ्रष्टाचार…

मांडवगण फराटा (संपत कारकूड): महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून तातडीने घेतलेल्या निर्णयात आनंदाच्या शिध्यासह नियमित आणि मोफतचे रेशन सर्व रेशन दुकानदारांना वेळेत पाठवून देखील तालुक्यातील अनेक गावांतील गरीब नागरिकांना धान्य दुकानदारांकडून शंभर टक्के वाटपच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या सर्व प्रकारामध्ये अनेक भ्रष्टाचार झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..

बापूसाहेब गावडे विद्यालयात तब्बल ४० वर्षापुर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विदयालात माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्नेहमेळावा व गुणवंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सन १९८४ ते २०२२ पर्यंतच्या इ.१० वी च्या प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून सन्मानपत्र,शाल व गुलाबपुष्प देवून सन्मानीत करण्यात आले.आतापर्यंत या विद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.त्यातील बरेचसे विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, अभियंते, वकील […]

अधिक वाचा..

करंदीकरांनी अनुभवली संगीतमय दिवाळी पाडवा पहाट

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे नुकतेच संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असता गावातील प्रतिभावंत कलाकारांनी यामध्ये सहभाग घेत आठ वर्षांच्या कलाकारापासून ते एकवीस वर्षांच्या युवकांपर्यंतच्या 22 कलाकारांनी दिवाळी पाडवा पहाट मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे आपल्याच गावातील बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी करंदीकर एकवटल्याने मोठ्या उत्साहात दिवाळी पाडवा पहाट संपन्न झाली आहे. करंदी […]

अधिक वाचा..

सणसवाडीतून क्रूरपणे गायांची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन क्रूरपणे गायांची वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले असून राजेश पंडित गायकवाड असे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या चे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून एम एच ४२ ए क्यू १९४९ या पिक अप मधून एक व्यक्ती […]

अधिक वाचा..

महिला पोलीस पाटलांची पोलिसांसोबत भाऊबीज

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे प्रत्येक वर्षी पोलिसांना सणाचा आनंद देत भाऊबीज साजरी करत असताना यावर्षी देखील काही महिला पोलीस पाटलांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यां समवेत भाऊबीज साजरी करत सणांपासून लांब राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद देण्याचा प्रयत्न करत उत्साहात भाऊबीज सन साजरा केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत प्रशासन सुट्टीवर तर पुढारी बांधकामावर

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गावातील धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय लोकांनी अतिक्रम करुन व्यावसायी गाळ्यांचे बांधकाम सुरु केले याबाबत अनेक तक्रारी होत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याबाबतचे लेखी आदेश दिलेले असताना देखील सदर व्यक्तींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रशासन सुट्टीवर असताना अतिक्रमण न काढता रात्रदिवस काम सुरु […]

अधिक वाचा..