शिरुर तालुक्यात नागाशी खेळणाऱ्यावर कारवाईची मागणी

नागासोबत स्टंटचा व्हिडीओ प्रसारित झाल्याने सर्पमित्र संतप्त शिक्रापूर: शिरुर तालुक्यात एक युवक विषारी नागाशी खेळत नागाला डिवचून जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने सर्पमित्रांनी नाराजी व्यक्त केली असून सदर युवकाचा शोध घेत कारवाई करत गुन्हे दाखल करण्याची मागणी शिरुर वनविभागाकडे केली आहे. शिरुर तालुक्यातील एका युवकाने विषारी नागाच्या शेपटीला पकडून नागाला हाताने डवचून […]

अधिक वाचा..

घोड धरणातून नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेकने विसर्ग

शिंदोडी (तेजस फडके): चिंचणी (ता. शिरुर) घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला होता. मात्र घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आहुपे खोऱ्यात मागील ८-१०दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील वडज, येडगाव धरणातून खाली घोड धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामधून सुमारे घोड धरणात ७५ टक्के पाणी साठा जमा झाला […]

अधिक वाचा..

मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेल्या 10 ते 11 वर्षांपासून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय परिपत्रकाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी साजरी करण्याबाबत मातंग नवनिर्माण सेना सातत्याने पाठवापुरावा करत असुन याबाबत पुन्हा एकदा याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राज्यपाल महोदयांच्या आदेशाप्रमाणे सर्व […]

अधिक वाचा..

माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत: एकनाथ खडसे

शिक्रापूरच्या माऊलीनाथ हॉस्पिटलला एकनाथ खडसेंची भेट शिक्रापूर: डॉक्टर त्यांच्या कार्यातून नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे मोलाचे काम करत असतात. शिक्रापूर येथील माऊली नाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सेवेसह अनेक समाजपयोगी कार्ये केले जात असल्याची बाब कौतुकास्पद असून माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी महसूलमंत्री विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..
Shikrapur Car Robbery

शिक्रापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या ३६२ कपड्यांसह मोटारीची चोरी…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाक्या वाहनांसह आदी चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत असताना आता चक्क शालेय मुलांच्या ३६२ कपड्यांसह कारची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे प्रकाश घोलप यांचे स्पोर्ट क्लबचे दुकान असून ते शालेय मुलांना देखील कपडे पुरवितात. […]

अधिक वाचा..
shirur nagar parishad

काय ती शिरूर नगर परीषद, काय ते पैसे खाणारे लोकसेवक…

शिरूर शहरात अनाधिकृत बांधकामांना उत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात गुजर मळा, प्रितम प्रकाश नगर, जोशीवाडी, मुंबई बाजार, रेव्हेन्यू कॉलनी, पवार मळा व शहरातील अनेक ठिकाणी विनापरवाना अनाधिकृतरीत्या बांधकामे सुरू असून, शिरूर नगरपरीषदेची कारवाईस टाळाटाळ करत आहे. शिरूर शहर परिसरात सन २०१७ पासून आजपर्यंत मोठया प्रमाणात सुरू आहेत. शिरूर नगरपरीषदेने फक्त महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचा ऋषिकेश जाधव वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी सीए

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ऋषिकेश सतीश जाधव याने जिद्दीच्या जोरावर यश संपादित करत सिए परीक्षा उत्तीर्ण होत वयाच्या एकविसाव्या वर्षी चार्टर अकाऊंटंट बनण्याचा विक्रम केला असल्याने शिक्रापूर सह परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्वसामान्य कुटुंबातील ऋषिकेश जाधव याचे शिक्षण वाघोली येथील जेएसपीएम विद्यालयातून सुरु झाले. ऋषिकेशचे वडील उच्चशिक्षित असून खाजगी […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील बंधाऱ्यावरुन व्यक्ती गेला दुचाकीसह वाहून

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरुन जाणारा एक व्यक्ती दुचाकी सह नदीच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास घडली असून दिवसभर शोध कार्य करुन देखील वाहून गेलेल्या व्यक्ती बाबतची काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रामध्ये मासेमारी करणारा एक व्यक्ती मासेमारी […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसाच्या संस्कार गावडेची नवोदय साठी निवड

शिक्रापूर: पिंपळे खालसा (ता. शिरुर) या महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संस्कार अविनाश गावडे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून संस्कारच्या यशामुळे शाळेने यशाची परंपरा कायम राखली. संस्कार गावडे सह त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिक सुशीला माकर व दिनेश निघोजकर यांचा शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थ व शिक्षकांनी सन्मान केला. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी धुमाळ

शिक्रापूर: शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी धुमाळ तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजीराव कोहोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या शिरुर तालुकाध्यक्ष पदी संभाजी धुमाळ, […]

अधिक वाचा..