शिक्रापूरच्या इंदिरा कॉलनीतील धोकादायक झाड काढले

शिरूर तालुका

शिक्रापुर (शेरखान शेख ) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील इंदिरा कॉलनी परिसरात खुप जुने असलेले धोकादायक झाड काढण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करत असताना अखेर ग्रामपंचायतने शिरुर वनविभागाच्या परवानगीने सदर धोकादायक झाड हटविल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

शिक्रापूर येथील इंदिरा कॉलनी येथे गेली अनेक वर्षापासून एक मोठे जीर्ण झालेल्या झाडाच्या अनेकदा फांद्या तुटून पडत होत्या. मात्र सदर झाड रस्त्याच्या कडेला असल्याने येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसह जवळील ग्रामस्थांच्या घराला देखील धोका निर्माण झाला असल्याने काही नागरिकांनी सदर झाड काढून टाकण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली असता ग्रामपंचायतच्या वतीने शिरुर वनविभागाकडे सदर झाड काढण्याची विनंती करण्यात आली. त्यांनतर शिरुर वनविभागाचे वनरक्षक प्रमोद पाटील यांनी सदर झाडाची पाहणी करत पंचनामा केला होता. अखेर शिरुर वनविभागाच्या परवानगीने सदर धोकादायक झाड हटविण्यात आले.

यावेळी सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, संतोष शेंडे, बाळासाहेब चव्हाण, रामदास गडदे, गोरक्ष कुंभार, शुभम चव्हाण, सोनाबाई बधे, अंजाबाई झोडगे, कविता कुंभार यांसह आदी उपस्थित होते. तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून धोकादायक झाड हटविण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.