Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जबरदस्तीने करायला लावली वेठबिगारी; महिलेने केला गुन्हा दाखल…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात जबरदस्तीने वेठबिगारी करावयास लावल्याने शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

एका ऊस ठेकेदाराने काही कामगार तीन महिन्याच्या कामासाठी ऊस तोडण्यासाठी चांडोह (ता. शिरूर) येथे आणले आहे. तीन महीने उलटल्यानंतरही कामगारांची ऊस तोडायची इच्छा नव्हती. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची मानसिक तयारी नसताना जबरदस्तीने काम करायला लावल्याने फिर्यादी बबली अजय जाधव (वय 25, व्यवसाय – मजुरी रा. सोनगाव ता. मुरबाड जि. ठाणे सध्या रा. चांडोह ता. शिरूर) यांनी दशरथ मंगु वाघ (रा. हादगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव) याच्याविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन येथे भा. द .वि. क 374,323,504,506 बंध बिगार पध्दती उच्चाटन अधि 1976 चे कलम 16,17,18 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, 05 नोव्हेबर 2023 रोजी ते दि 11 फेब्रुवारी 2024 रोजी चांडोह (ता. शिरूर जि. पुणे) येथे मुकादम दशरथ वाघ (रा. चाळीसगाव) याने फिर्यादी यांना 25 हजार रूपचे उचल देऊन तीन महिने उस तोडीचे मजुरी काम करण्याचा तोंडी करार करून त्याप्रमाणे त्यांच्या कडून उसतोडीचे मजुरी काम करून घेऊन करार पुर्ण झाल्यानंतर उस तोडीचे मजुरी काम करण्यास कामगारांनी नकार दिल्याच्या कारणावरून कामगाराला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या इच्छेविरूध्द उस तोडीचे मजुरीचे काम करण्यास भाग पाडले. त्यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरक्षक सुनिल उगले हे करीत आहेत.

शिरूर तालुक्यात लघूशंकेसाठी घराबाहेर पडणे पडले महागात…

पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ

शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण

शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…

शिरुरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक