शिरुर शहरातून बुलेटची चोरी; गुन्हे दाखल

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह व शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, महीलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवजाची चोरी, खुण, दरोडा या पाठोपाठ दुचाकी चोऱ्यांचे सत्र वारंवार घडत आहे. नुकतीच शिरूर शहरातील रेव्हुन्यू कॉलनीतील उमेश आनंदा इसवे या युवकाची बुलेट मोटारसायकल अज्ञात इसमांनी चोरून नेली आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, उमेश आनंदा इसवे (वय २८) रा. स्काय सुशिला अपार्टमेंट, रेव्हुन्यू कॉलनी, शिरूर येथील रहीवाशी असून ते चारचाकी व 2 चाकी बॅटरी विक्रीचा व्यवसाय करत आहे. दैनंदिन वापरासाठी त्यांनी सन २०१५ मध्ये बुलेट मोटार सायकल नं. MH.12.MH.0022 ही विकत घेतली होती. (दि. १) फ्रेबुवारी रोजी बुलेट मोटार सायकल ही घरासमोर पार्किंग मध्ये पार्क केली होती. त्यादिवशी रात्री ते पुणे येथून १२ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी बुलेट मोटारसायकल समोर पार्किंग मध्ये होती.

त्यानंतर ते घरात जावून झोपलो, दि. ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आले. त्यावेळी घरासमोर लावून ठेवलेली बुलेट मोटार सायकल दिसून आली नाही. म्हणून तिचा शिरूर परिसरात आजपर्यंत शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

घराबाहेर लॉक करून पार्क करून लावलेली रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या समतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इराद्याने स्वतःचे फायदयाकरीता चोरुन नेली आहे म्हणून त्या अज्ञात चोरट्याविरुध्द कायदेशीर फिर्याद शिरूर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक गवळी हे करत आहेत.

गुन्हा घडणे पोलिसांच्या हातात नसले तरी काही गुन्हे वगळता चोऱ्या, खुण अपुरे कर्मचारी असतानाही उघडकीस आणण्याचे काम शिरूर पोलिस कौशल्यपुर्ण तपासाने पुर्ण करत आहे.