इरसालवाडी भागातील सर्व धोकादायक गावांचे पुनर्वसन करावे; नाना पटोले

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इरसालवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक […]

अधिक वाचा..

शिरुरच्या बेट भागात अवैध गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांची छापा टाकत धडक कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारताच पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई सुरु केली असुन शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी तसेच कवठे येमाई येथील अवैध गावठी दारु व्यवसायावर धाड टाकत लाखों रुपयांचा मुद्देमाल जाग्यावर नष्ट केला आहे. बेट भागातील बाळू रुपाजी मुंजाळ (रा.मुंजाळवाडी, कवठे येमाई) […]

अधिक वाचा..

तुमच्या भागातील लाईट गेल्यास या नंबरवर द्या मिसकॉल…

संभाजीनगर: महाराष्ट्रातल्या महावितरणच्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. तुमच्या भागात कुठल्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाला असेल, तर फक्त एका मिस् कॉलवर तक्रार नोंदवून विशेष म्हणजे त्यानंतर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. महावितरणने त्यासाठी मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. टोल फ्री क्रमांक, महावितरणचे ॲप आणि संकेत स्थळावरून सुद्धा तक्रार नोंदवता येणार आहे. या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

तीन महिन्यात अकरा विनयभंग तर चार बलात्काराचे गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या महिलांवरील अत्याचार, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून 3 महिन्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनयभंगाचे 11 बलात्काराचे 4 गुन्हे दाखल झाले असून या पीडितांमध्ये अल्पवयीन युवतींची संख्या जास्त असल्याने महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला […]

अधिक वाचा..

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरी झाल्याने श्वान पथकाच्या सहाय्याने परिसराची कसून तपासणी

पोलीस निरीक्षकांच्या आईसह महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवले शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील कमळजाई नगर येथे एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या घरात आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन पोलीस निरीक्षकाच्या आईसह शेजारील एका महिलेच्या घरात घुसून दोघा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा उच्छाद, खुणाच्या, चोरीच्या घटना उघडकीस येईना…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत खुणासह, बलात्कार, सोनसाखळी चोऱ्या, मंदीरातील चोऱ्या, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, ठिबक सिंचन संच चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यातील अनेक गुन्हे अदयापपर्यंत उघडकीस आले नसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेला आरोपी अदयापपर्यंत फरार आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल हे नेहमीच वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांच्या वतीने नुकतेच परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयास स्वामी विवेकानंद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवक रील्स बनवायला गेले अन जेल मध्ये अडकले…

शिक्रापुरात तलवार, कोयत्यासह दोघे ताब्यात व तिघांवर गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सोशल मीडियावर हातात तलवार व कोयता दाखवून रील्स बनवून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी तलवार व कोयत्या सह ताब्यात घेतल्या असून ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार, दुर्वांश शिवाजी क्षेत्री, दिलावर सुभान शेख या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे. […]

अधिक वाचा..

शिक्रापूर हद्दीत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

अपघातग्रस्ताच्या मदतीस आलेल्या रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू होत असताना शिक्रापूर, कोरेगाव भीमा, जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये महेश राजाराम गव्हाणे, श्रीकांत सुर्यकांत उबाळे, उद्धव सखाराम सातपुते, बाबूशोना आबेदअली शेख व अजयभान चंद्रकांतभाई भावसार या 5 जणांचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बेट भागातुन दुचाकी चोरीला, चोऱ्यांचे सत्र सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकतीच पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली आहे. तर कवठे येमाईच्या काळुबाई नगर येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २१) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान मौजे काळुबाईनगर, कवठे येमाई गावाचे हद्दीत फिर्यादी मनोहर वसंत नरवडे यांचे रहाते घरासमोर […]

अधिक वाचा..