खंडणीखोर महेश जगतापला तीन दिवस पोलीस कोठडी

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका ठेकेदाराला मारहाण करत खंडणी घेऊन गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय नेत्यांचा आश्रय घेत 4 महिने फरार असलेल्या ठेकेदाराला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील ठेकेदाराला मारहाण करत खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला महेश जगताप फरार झाला असताना अनेकदा राजकीय नेत्यांच्या नावाचा आश्रय घेत तब्बल 4 महिने फरार असताना पोलीस नाईक शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, जयदीप देवकर, विकास पाटील, लखन शिरसकर, निखील रावडे यांनी जेरबंद केले होते, तर महेश जगताप अनेक ठिकाणी राजकीय लोकांच्या आश्रयाला असल्याबाबतचे काही पुरावे सोशल मीडियात प्रसारित झालेले असताना देखील शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.

शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या महेश जगताप याला शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आता पोलीस त्याला आसरा देणाऱ्या तसेच 4 महिने त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांची माहिती घेत महेश जगताप वरील यापूर्वीच्या गुन्हेगारीचा आढावा घेत त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचे बोलले जात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे करत आहे.