Crime

बंटी बबली कडून शिरुर मधील महिलांची फसवणूक

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर मधील काही महिलांना त्यांच्याशी ओळख निर्माण करुन एका बंटी बबली ने गंडा घालत महिलांची 10 लाख रुपयांसह 10 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अनिषा विजय लोखंडे व विजय लोखंडे या बंटी बबलीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरुर येथील महिलांची श्रीगोंदा तालुक्यातील अनिषा लोखंडे या महिलेशी ओळख झालेली होती. त्यानंतर सदर महिला नेहमी शिरुर येथील महिलांकडे येत होती, त्यांनतर २०२० मध्ये लोखंडे या महिलेने माया म्हस्के यांच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. त्यानंतर म्हस्के यांच्या प्रमाणे त्यांच्या ओळखीच्या अन्य महिलांकडून देखील पैसे घेत तब्बल 10 लाख रुपये काही महिलांकडून गोळा करुन घेतले.

तसेच त्यांनतर पुन्हा पैसे लागत असताना म्हस्के यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांच्या जवळील साडेपाच तोळे वजनाचे तसेच अन्य महिलांचे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन गेले. मात्र त्यानंतर महिलांचे दागिने तसेच पैसे देखील दिले नाही, महिला वारंवार मागणी करत असताना दोघे देखील टाळाटाळ करत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आली.

याबाबत माया सुदेश म्हस्के (वय ३६) रा. करंजुलेनगर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अनिषा विजय लोखंडे व विजय लोखंडे दोघे रा. घोटवी ता. श्रोगोंदा जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहे.