शिरूरमधील सराफास खंडणी मागणारा ७२ तासांत जेरबंद…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामधील सराफास एक कोटी रूपयांची खंडणी मागणाऱयाला स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई ७२ तासांत जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर शहरातील सराफ व्यावसायिक वैभव खाबिया यांना ०४/०७/२०२२ रोजी अनोळखी नंबरवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून व मेसेज करून मी डी. के. ग्रुपमधुन बोलत आहे, तु मला खंडणीसाठी एक कोटी रुपये दिले नाहीतर मी तुझा व तुझे कुटुंबाचा गेम वाजवणार, तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणाला. डी.के. ग्रुपचे नाव सांगून सराफ व्यावसायिक वैभव खाबिया यास त्याचे कुटूंबासह जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला योग्य त्या सुचना करून सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश केले होते. शिरूर शहरात झालेल्या प्रकरणामुळे व्यापान्यांमध्ये दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादी वैभव खाबिया यांना धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपी टाकळी कडेवळीत (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे ०३/०७/२०२२ रोजी पंढरीचे वारीला जात असलेल्या वारकऱ्याचा मोबाईल चोरी करून त्या मोबाईलचा व त्यामधील सिम कार्डचा वापर करून सराफ व्यावसायिक वैभव खाबिया यास कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देवून एक कोटी रूपयांची खंडणीची मागणी करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

शिरूर शहरातील व्यापाऱ्याला मागितली कोट्यावधीची खंडणी…

तपास पथकाने आपआपले गुप्त बातमीदारांची मदत घेवून सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी राहुल सुखदेव गायकवाड (रा. कोहोकडी ता. पारनेर जि. अहमदनगर) याने केला असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला. तो लोहगाव पुणे परीसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावर लोहगाव परीसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून राहुल सुखदेव गायकवाड यास ताब्यात घेतले. आरोपी राहुल गायकवाड याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु, त्याला विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा पैश्यांच्या गरजेपोटी केल्याचे सांगितले. तसेच त्याचेवर यापुर्वी पारनेर, सुपा, श्रीगोंदा, शिरूर, शिक्रापुर पोलिस स्टेशन ठिकाणी एकुण नऊ गुन्हे दाखल असून तो सध्या शिक्रापूर, श्रीगोंदा पोलिस स्टेशनकडील एकूण चार गुन्हयात दीड वर्षांपासून फरार होता.

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके सो. पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहा फौजदार तुषार पंदारे, पो.हवा.जनार्दन शेळके, पोहवा. राजू मोमीण, पो.ना. मंगेश थिगळे, चा. सहा फौजदार मुकुंद कदम यांनी केली आहे.

unique international school
unique international school