पिंपरखेड बँक दरोडा प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

क्राईम

पाच आरोपींकडून जप्त केलेला अडीच कोटीच्या वरील मुद्देमाल,रोख रक्कम बँकेकडे सुपूर्द
शिरुर:
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँक शाखा कार्यालयात दिवसा ढवळ्या दरोडा पडल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली होती. यात सुमारे अडीच कोटींच्यावर मुद्देमाल आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली होती. या गुन्हयाचा छडा लावणे पुणे ग्रामीण पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

unique international school
unique international school

पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर आरोपींनी येथे गेल्या वर्षी दिवसा-ढवळ्या दरोडा टाकून बँकेतील रोख रक्कम व दागिने असा एकूण २ कोटी ७९ लाख ७२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी पुणे ग्रामीण गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय जलदगतीने तपास करीत धडाकेबाज कारवाई करीत आरोपींचा शोध घेत पाच आरोपी गजाआड केले होते. तर या दरोड्यातील आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल,रोख रक्कम शिरूर न्यायालयाच्या आदेशानुसार शिरुर पोलिसांकडून बँकेच्या ताब्यात देण्यात आली.

या गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली वाहने पोलिसांनी जप्त केली होती. दरम्यान या दरोड्यातील जप्त केलेले २ कोटी २९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २२ लाख १२ हजार ६९० रुपये रोख रक्कम असा एकूण २ कोटी ५१ लाख १३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल बँकेच्या ताब्यात देण्याचा आदेश शिरुर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून देण्यात आला होता. त्यानुसार शिरुर पोलिसांकडून पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक मोहित चव्हाण, अखिलेश कुमार यांच्या कडे सदरील जप्त केलेला मुद्देमाल देण्यात आला.

यावेळी बँकेचे कायदेशीर सल्लागार ऍड. डी एम. सोंडेकर, व्यवस्थापक प्रशांत किसना, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, पोलिस हवालदार दिनेश कुंभार, बाळू भवर, नितीन सुद्रिक हे उपस्थित होते. पिंपरखेड येथील बँकेत नागरिकांनी गुंतवणूक केलेली रोख रक्कम व दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेच्या ताब्यात दिल्याने दागिने व रोख रक्कम सर्वसामान्य नागरिकांना मिळणार असल्याने नागरिकांनी ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.