शिक्रापूरात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत काही रक्कम जप्त करुन सचिन साहेबराव कसबे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी एका पत्र्याचे शेड मध्ये एक युवक कल्याण मटका नावाने मटका चालवत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक शिवाजी चितारे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता एक युवक नागरिकांना कागदावर आकडे लिहून देत कल्याण मटका नावाचा मटका चालवत असल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांनी त्यांना जागेवर पकडून त्याच्याजवळील मटक्याचे साहित्य व काही रक्कम जप्त करत त्याला ताब्यात घेतले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शिवाजी युवराज चितारे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सचिन साहेबराव कसबे (वय ३२) रा. चेअरमन वस्ती सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.