पुणे-अहमदनगर महामार्गावरील दिशादर्शक फलकाचा जाहिरातीसाठी सर्रास वापर…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहमदनगर महामार्गावर शिरुर बाह्यवळणच्या पुढे असणाऱ्या दिशादर्शक फलकाचा गेल्या दोन वर्षांपासुन जाहिरातीचे होल्डिंग लावण्यासाठी सर्रास वापर होत असुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील जाहिरातीचे होल्डिंग लावणाऱ्या व्यक्तींना फुकट जाहिरात लावण्यासाठी हक्काची जागाच मिळाली आहे.

गेल्या दिड ते दोन वर्षांपासुन पुणे-अहमदनगर महामार्गावर शिरुरच्या बाहेरुन जाणाऱ्या महामार्गावर जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव, वाशिम, बुलढाणा, अकोला, नागपुर अशा विविध जिल्ह्यात जाण्यासाठी रस्त्याचे अंतर असणारा दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आला होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासुन त्याच दिशादर्शक फलकाच्या जागेवर शिरुर तालुक्यातील वेगवेगळ्या नेत्यांचे वाढदिवस तसेच वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यांच्या मोठया मोठया जाहिराती या दिशादर्शक फलकावर लावल्या जातात.

 

त्यामुळे पुण्यावरुन जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव, वाशिम, बुलढाणा, अकोला, नागपुर अशा विविध जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची दिशाभूल होत आहे. मात्र हा दिशादर्शक फलक अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असल्याने शिरुर किंवा पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावर काहीच कारवाई करत नसल्याचे एका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे आता अहमदनगर सार्वजनिक विभागाचे अधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.

शिरुर तहसिलकडून नवीन रेशनकार्डसाठी नागरीक वेठीस; रेशनिंगच्या धान्याचाही होतोय काळाबाजार

शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणण्यासाठी वाळू माफिया वापरत असलेल्या गाडीचा वापर..? नागरिकांमध्ये कुजबुज

शिरुर तालुक्यातील त्या लग्नपत्रिकेची होतेय पुणे जिल्हयात चर्चा, प्रत्येक गावासाठी वेगवेगळी पत्रिका