शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

क्राईम

वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन युवतींची सुधार गृहात रवानगी

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय वर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दोघा युवतींसह लॉज चालकाला ताब्यात घेतले असून तिघांवर गुन्हे दाखल करत दोघी युवतींची महिला सुधार गृहात रवानगी केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे असलेल्या बालाजी लॉजवर बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, चंद्रकांत काळे, पोलीस नाईक अशोक केदार, अमोल दांडगे, महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर, उज्वला गायकवाड, पोलीस शिपाई किशोर शिवणकर यांनी सदर ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता त्यांना सदर ठिकाणी लॉज चालकासह वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन युवती मिळून आल्या पोलिसांनी सदर युवतींना ताब्यात घेत चौकशी केली असता लॉज चालक सुनील राठोड हा आम्हाला वेश्या व्यवसाय साठी ठेवत आम्हाला वेश्याव्यवसाय साठी प्रोत्साहित करत असल्याचे सांगितले.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

दरम्यान पोलिसांच्या पथकाने दोन्ही युवतींसह लॉज चालकाला ताब्यात घेतले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र शिवाजी पानसरे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी लॉज चालक सुनील जयराम राठोड (वय २७) रा. प्रथम सोसायटी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. ब्राम्हणगाव ता. जिंतूर जि. परभणी याच्या सह दोन युवतींवर गुन्हे दाखल करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुनील राठोड याला पोलीस कोठडी सुनावत वेश्या व्यवसाय करणाऱ्या युवतींची महिला सुधार गृहात रवानगी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस शिपाई अतुल पखाले हे करत आहे.