सणसवाडीतून डंपर वाहनाच्या बॅटऱ्या चोरी: गुन्हे दाखल

क्राईम

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथे वाहनांच्या बॅटऱ्या तसेच डिझेल चोरीच्या घटना वारंवार घडत असताना नागरिक हिराज झालेले असून नुकतेच येथील एका हॉटेल शेजारील पार्किंग मधून २ डंपरच्या ४ बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

डिंग्रजवाडी (ता. शिरुर) येथील कानिफनाथ गव्हाणे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्याकडे काही डंपर देखील आहे, सायंकाळच्या सुमारास गव्हाणे यांच्या वाहनांचे चालक डंपर सणसवाडी येथील पेशवाई हॉटेल शेजारील पार्किंग मध्ये लावून घरी जात असतात. ८ ऑगस्ट रोजी चालकांनी त्यांच्या ताब्यातील एम एच १२ क्यू जि ८५६६ व एम एच १४ जि यु ५६११ क्रमांकाचे दोन डंपर पेशवाई हॉटेल शेजारील पार्किंग मध्ये लावून घरी गेले. सकाळच्या सुमारास चालक वाहने घेऊन जाण्यासाठी आले असताना वाहन चालू होत नसल्याने पाहणी केली असता दोन्ही डंपर च्या दोन दोन अशा सुमारे ४ बॅटऱ्या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत कानिफनाथ रामदास गव्हाणे (वय ३३) रा. डिंग्रजवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवीकिरण जाधव हे करत आहे.