शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील बॅक ऑफ इंडिया शाखेत हातचलाखी करुन १९ हजार लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखला झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील बँक ऑफ इंडिया याबॅकेच्या शाखेमध्ये अभिमन्यू कांबळे यांनी ०५ ऑगस्ट रोजी दुपारी १.१५ वाजता आपल्या खात्यातील ५० हजार रुपये काढले. कॅश काढल्यानंतर शेजारील व्यक्तीने या बंडलमधील नोटा नकली आहेत. मी चेक करून देतो, अशी बतावणी करून हातचलाखी करून त्या बंडलमधील १९ हजार रुपये लंपास केले आहेत. याबाबत अज्ञात विरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखला झाला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, अभिमन्यु शंकरराव कांबळे (वय ६९, व्यवसाय सुखवस्तु, रा. आंबळे, ता. शिरूर) हे न्हावरा ता. शिरूर गावातील बँक ऑफ इंडीया मध्ये कॅश काढण्यासाठी गेले होते. बँकेमधुन ५० हजार रूपये काढून बँकेमध्ये असलेल्या बॅचवर पैसे मोजत असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या शेजारी येवुन बसली. या पैशामध्ये नकली नोटा आहेत, मी चेक करून देतो असे म्हणून त्यांच्या कडील ५० हजार रूपये घेवुन त्यामधील १९ हजार रुपये हातचलाखीने काढून घेतले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. थेउरकर हे करत आहेत.
चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…
शिरूर! तुला खुप माज आला आहे का, तुझ्या टंगड्याच काढतो…
शिरूर तालुक्यात महिलेला शिविगाळ करून केला विनयभंग…
शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक…
शिरूर तालुक्यात खंडनी न दिल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…