सादलगाव (संपत कारकूड): पुणे जिल्यातील सर्वच धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच खडकवासला धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदी तुडुंब भरून वाहत आहे.
नदीवरील कोल्हापूर टाईपचे सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून सादलगाव येथील बंधारा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यावरील वाहतूक दुपारपासूनच बंद करण्यात अली आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारी दिवसा पाणी आल्यामुळे बाहेर काढण्यास बहुतांश शेतकऱ्यांना यश आले आहे. २०१९ मध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये नदीकाठावरील गावांचे मोठे नुकसान झाले होते. या पुराची आठवण करून देणारा पूर भीमा नदीला आलेला असून नदी काठावरील सादलगाव, मांडवगण फराटा, नागरगाव, बाभुळसर बुद्रुक, गणेगाव इत्यादी गावांना या पुराची झळ पोचणार आहे.
विशेष म्हणजे एवढा मोठा पूर आला तरी महसूल महसूल यंत्रणा गुरुवारपर्यंत गावात पोचली नसून या यंत्रणेकडून नागरिकांना कोणतीही धोक्याची सूचना दिलेली नाही. सादालगावमध्ये नदीलगत भिल्ल वस्तीतील ११ कुटुंबाना त्यांच्या वस्तीतून बाहेर काढून त्यांच्या कुटुंबासह गावातील मराठी शाळेत हलविण्यास मांडवगण फराटा पोलीस प्रशासन व गावचे पोलीस पाटलांनी सांगितले आहे. गाय, म्हशीच्या गोठयातील जनावरे इतरत्र हलवण्यासाठी नागरिकंनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न चालू होते. वडगाव रासाई येथील पुलाच्या स्लॅबला पाणी असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
शिरूर-हवेलीत पूरग्रस्त मदतीसाठी चंदन सोंडेकर यांचे आवाहन!
शिरूर तालुक्यातील बेट भागात सलग तीन दिवस पाऊस…
Video: कारेगाव येथे ढगफुटी सदृश पाऊस; पुणे-नगर महामार्ग पाण्यात…
विडिओ: पिंपरखेड मध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस….
शिरुर तालुक्यात बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; अधिकारी वसुलीत मग्न…