लोणीकंदः लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरुन एका युवकाने (वय २०) युवतीचे नग्न अवस्थेतील फोटो फिर्यादीच्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. शिवाय, आरोपीने मुलीला ठार मारण्याची धमकी दिली.
लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (वय 32) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने एप्रिल महिन्यात आपला वाढदिवस असल्याचे सांगून फिर्यादीला लॉजवर घेऊन जात जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीने लोणीकंद पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी युवती 9 ऑगस्ट रोजी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिच्या आईच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅपवर फिर्यादीचे नग्न अवस्थेतील अश्लील व्हिडीओ पाठवले. आरोपीने फिर्यादीच्या आईला मेसेज करुन मी तुझ्या मुलीला आणि मुलाला ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित
शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित
हिवरे कुंभार मध्ये आढळला लोणीकंदच्या मुख्याध्यापकांचा मुतदेह