पौष्टिक तृणधान्य खाऊन घरातील जेष्ठांप्रमाणे वयोमान मिळवा; डॉ पाटोळे

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना लाभलेले आयुष्यमान आपल्याला मिळवायचे असेल तर पौष्टिक तृणधान्य अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच आहारात ज्वारी, बाजरी, राळा, सामा, हिरवा सावा, नाचणी, भगर, कोडा यासारख्या तृणधान्याचा आहारात वापर वाढवा असे आवाहन डॉ रोनक पाटोळे यांनी दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट येथील विद्यार्थींना केले.

शिरुर तालुका कृषी अधिकारी आणि दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट संयुक्त विद्यमाने गुनाट ता शिरुर येथे कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमासाठी इयत्ता ८ वी, ९वी व १०वी तील विद्यार्थी यांच्यासह उपमुख्याध्यापक सतीश कोळपे, संगिता सोनवणे, पुष्पा वाघमोडे, अश्विनी कौठाळे गुनाट सोसायटीचे माजी अध्यक्ष संभाजी गाडे, पांडुरंग करपे यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ रोनक पाटोळे कृषी सहायक जयवंत भगत उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ पाटोळे पुढे म्हणाले की, जेष्ठ व्यक्तींच्या आहारात फास्ट फुड कमी आणि बाजरी, ज्वारी, दुध, भाजीपाला जास्त असल्याने त्यांचे आरोग्य निरोगी राहिले आणि आजारापासून बचाव झाला. हल्ली रोजच्या आहारात ज्वारी व बाजरी कमी करुन गव्हाचा आहारात जास्त वापर झाल्याने ग्लुटेन जास्त निर्माण झाल्याने भविष्यात आजार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. या तुलनेत ज्वारी, बाजरी, राळा, कोडा, नाचणी यात ग्लुटेन कमी असल्याने व पचनास हलके असल्याने आरोग्याला लाभदायक ठरत आहे.

तृणधान्य हे जीभेच्या चवीपेक्षा शरीराच्या गरजेला महत्त्व देत असताना प्रथम तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडा, सामा अशा तृणधान्यास महत्व दिले गेले पाहिजे तरच भविष्यात शुगर बीपी हृदयविकार यासारखे आजार उद्भवनार नाहीत म्हणून आहाराला अनन्य महत्व असुन सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी फायबर व प्रोटिन्स आयर्नला गरजेचे असुन कारबोहायड्रेट ला दुय्यम स्थान दिले गेले पाहिजे असे हि सांगितले.

यावेळी बोलताना कृषी सहायक जयवंत भगत यांनी पंजाब राज्यात कॅन्सर ट्रेन चालू असुन भविष्यात असे आजार जास्त उद्भवू नये यासाठी काळजी घ्यावी लागणार असुन कॅन्सर सारख्या आजारावर कोडो, नाचणी, हिरवा, सावा सामा, वरई हि तृणधान्य वरदान ठरत असून अनेक ठिकाणी कॅन्सर रुग्णांना आठवड्याचे नियोजनात तृणधान्याचा शेड्युल दिले गेल्याने फायदा दिसुन आल्याचे सांगितले. जयवंत भगत यांनी याबाबत प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था पुणे या ठिकाणी याबाबत दोन दिवसाचे प्रशिक्षण घेतले.

कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे करंजे तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर काम करणाऱ्या डॉ सोनम कापसे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे कार्यरत असलेल्या प्रा डावखर महेश लोंढे यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील शेतकरी व विद्यार्थी मित्रांना होत असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतीश कोळपे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद यांच्यासह कृषी सहायक जयवंत भगत यांनी योगदान दिले तसेच डॉ रोनक पाटोळे यांनी सर्वांना तृणधान्याचा वापर वाढविण्यासाठी शपथ दिली. या कार्यक्रमाचे आभार वाघमोडे यांनी मानले