ST

शिरूर-पूर्व भागात एसटी गाड्यांचे वाजले बारा…

मुख्य बातम्या

मांडवगण फराटा (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील पूर्व भागात पुरेशा आणि वेळेला एसटीची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

बागाईत पट्टा म्हणून ओळखला जाणारा आणि शिरूर तालुक्यातील राजकारणात गेली अनेक वर्ष आपले राजकीय अस्तित्व टिकून या भागाला सुजलाम-सुफलाम करून विकासाच्या उंचीवर पोचलेल्या वडगाव रासाई – कुरुळी- मांडवगण फराटा व तांदळी- दरम्यानच्या पुरेशा आणि वेळेला एसटी गाड्या नसल्यामुळे शालेय विद्यार्थी आणि प्रवाशी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी महामंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.

करोनानंतर कोसळलेले एसटी फेऱ्यांचे शेडूल एसटी महामंडळाला अजूनही ठीक करता आलेले नाही. शिरूर आगाराचे प्रमुख भैरवनाथ दळवी यांच्याकडे प्रवाशांकडून अनेक लेखी व तोंडी निवेदने देण्यात आली. तक्रार बुकात वेळोवेळी तक्रारही नोंद केली. तालुका प्रतिनिधींनी एसटीच्या समस्याबाबत चौकशी करून झाली. परंतु, शिरूर एसटी व्यवस्थपणाला कोणताच घाम फुटला नाही, त्यांनी फक्त तक्रारी ऐकून घेतल्या. परंतु या मागणीला व समस्याला फक्त गाजर दाखवविण्यापलीकडे काहीच काम केले नाही.

विशेष बाब म्हणजे एसटी आगाराकडून संपूर्ण दिवसभरात वरील भागाकडे सकाळी ८.३० वाजता न्हावरे मार्गे एक गाडी येते. ही गाडी एकदा या भागातून शिरूरला निघून गेल्यावर मधल्या काळात शिरूर येथे जाण्यासाठी भरवशाची गाडीच नसते. तसेच गोलेगाव मार्गे तांदळीकडे गाडी सोडली जावी अशीही जुनी मागणी आहे. परंतु, ही गाडी कधीच वेळेला सोडली जात नाही. त्यामुळे प्रवाशी या गाडीचा नाद सोडून देत आहेत. शिरूरवरून शेवटची ६ वाजता सुटणारी तांदळी गाडीची वेळ निश्चित नाही. या गाडीबरोबर अपडाऊन करणारे विद्यार्थ्यांना एसटी स्टॅण्डवर ताटकाळत बसावे लागत आहे.

शिरूरचे काम आटपून घरी येणाऱ्या नागरिकाना आपण घरी कधी पोहचू याचा कधीच भरोसो नसतो. शिरूर पूर्व भागात किमान तीन गाड्या येण्यासाठी व त्या परत जाण्यासाठी त्याही वेळेत सोडण्याची गरज आहे. परंतु फक्त दोन गाड्यवरच या भागाची बोळवण करून अनेक प्रवाशांची सोय शिरूर आगार का करीत नाही? शिरूर आगारचे हे नियोजन प्रवाशांची सोय होण्याऐवजी गैरसोय करीत आहे. यामध्ये लवकरात लवकर तोडगा काढावा आणि योग्य नियोजन करून एसटी वेळेवर सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
(क्रमशः)

रांजणगाव, शिरूर येथील प्रवाशांना एसटी बस मध्ये बसण्यास नाकारू नये…

शिरुर तालुक्यातील पत्रकाराला शिवीगाळ करणे पडले महागात, अखेर एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन

महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत सुरु

सुरक्षित प्रवास हेच एसटीचे प्रमुख ध्येय…

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार एसटी बसमधून मोफत प्रवास; कसा तो पहा…

एसटीमध्ये ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे मिळणार तिकिट; कसे ते पहा