Video : पुणे नगर महामार्गावर रंगला बर्निंग कारचा थरार

क्राईम

कंटेनर चालकाने नेले प्रवाशांसह कारला 2 किलोमीटर ढकलत

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने एका कारला ठोकर देत कार मध्ये बसलेल्या प्रवाशांसह कार चक्क 2 किलोमीटर फरपटत नेल्याचा बर्निंग थरार घडला असून कार मधील प्रवाशांसह बालिका सुदैवाने बचावली असल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनरचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन गणेश चतुर हे त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या ताब्यातील एम एच १६ बी वाय २७८१ या कार मधून रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चाललेले असताना पाठीमागून आलेल्या एम एच ०४ एच एस १०९३ या कंटेनरने चतर यांच्या कारला ढोकर दिली. यावेळी कार आडवी झाली मात्र कंटेनरचालक तसाच कंटेनर पुढे घेऊन गेला.

दरम्यान कारच्या टायर मधून अक्षरशः जाळाचे लोळ निघत होते. यावेळी रस्त्याचे कडेला असलेल्या हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या अमोल कुसाळकर, शुभम माने, बलवंत पवार, विकास शिंदे, श्रेयस मांढरे, दादा ओझरकर, बंटी पवार यांसह आदीं नागरिकांनी कंटेनरचा पाठलाग करत त्याला 2 किलोमीटर अंतरावर अडवले तो पर्यंत कार कंटेनरच्या पुढे अडकून ढकलली गेली.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक राकेश मळेकर, अंबादास थोरे, लखन शिरसकर, रोहिदास पाखरे आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने अपघातातील वाहने बाजूला करत वाहतूककोंडी सुरळीत करत रस्ता मोकळा केला. मात्र घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले. सुदैवाने कार मधील प्रवाशांसह दीड वर्षाची बालिका बचावली परंतु कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

सदर अपघातात कार चालक गणेश चतर किरकोळ जखमी झाला असून याबाबत गणेश पोपट चतर (वय ३2) रा. गांजी भोयरे ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अजगर हुसेन पिंजरी रा. शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.