वाढदिवसाच्या स्टेटस नंतर दोन दिवसातच मित्रांवर श्रद्धांजलीच स्टेटस ठेवण्याची वेळ

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे पुणे नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात शुभम दत्तात्रय दिवेकर या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे राहणारा शुभम दिवेकर रात्रीच्या सुमारास मलठण फाटा येथे असलेल्या शुभम मिसळ येथे गेलेला होता. सदर ठिकाणी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची त्याला धडक बसून अपघात झाला.

दरम्यान येथील नागरिकांनी त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शुभम दत्तात्रय दिवेकर (वय 23) रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. भांडगाव ता. दौंड जि. पुणे याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत रवींद्र केशव शिवले (वय ३२) रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने हे करत आहे.

शिक्रापूर येथील अपघातात मयत झालेला शुभम दिवेकर याचा (दि. २६) ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. त्यावेळी सर्व मित्र परिवाराने वाढदिवस शुभेच्छा देत स्टेटस ठेवले होते. मात्र दोनच दिवसात मित्रांना शुभमच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवण्याची वेळ आली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.