शिरुर तालुका डॉट कॉमच्या वृत्ताने व्यापारी संकुलाच्या भूमिपुजनाचे प्लेक्स उतरवले

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील एस.टी. स्टॅण्डसमोर नगर परीषदेच्या व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. १६ रोजी सांयकाळी आयोजीत केला होता. यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार जाहीरातबाजी करत शहरात प्लेक्स लावले होते. त्यात इतर पक्षांना अतिशय खुबीने डावलण्यात येवून स्वतःचा उदो उदो करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांकडून होत असल्याचे वृत्त शिरुर तालुका.कॉमने प्रसिद्ध करताच तातडीने हालचाली होऊन रात्रीत हे प्लेक्स काढले आहेत. याची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.

दरम्यान नगरपरिषद प्रशासणाने भुमिका स्पष्ठ केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा डाव फसल्याची चर्चा शिरुर शहरात होती. शिरुर शहरातील प्रसिद्ध उदयोगपती प्रकाश शेठ धारीवाल यांनी सर्वपक्षीयांना एकत्र घेत नगर परिषदेवर सत्ता प्रस्थापीत करत शहराचा विविध विकास कामांच्या माध्यमातून कायापालट करणाच्या प्रयत्न ते करत आहे. शिरुर शहराच्या विकासात माजी नगराध्यक्षा तथा उद्योगपती स्व. रसिकलाल धरिवाल यांचे मोठे योगदान आहे. शिरुर शहरातील कुठल्याही विकास कामातील कार्यक्रमात त्यांचा फोटो असणे महत्वाचे आहे.

परंतु शिरुर नगर परिषद व्यापारी संकुल भूमिपूजन समारंभ या कार्यक्रमात त्यांचा बॅनर व विविध वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातींमध्ये रसिकलाल धरिवाल यांचे छायाचित्र असणे आवश्यक होता. त्यांचे छायाचित्र नसल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. शहरात व्यापारी संकुल व्हावे ही धारीवाल यांची कायम इच्छा होती. त्यासाठी त्यांनी ही जागा त्याच्या शिरुर शहर विकास आघाडीची सत्ता असताना शासनाकडून विकत घेतली होती. शिरूर शहराच्या विकासकामात त्यांचाही फोटो असायला हवा अशी शिरूरकरांची इच्छा आहे. परंतु धरिवाल यांचे छायाचित्र प्लेक्सवर का घेतले नाही हा प्रश्न शिरूरकरांना पडला आहे.

नगर परिषदेला कार्यक्रमाची माहीतीच नाही; बोरकर

याविषयीनगर परीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी धक्कादायक माहीती दिली असून ते म्हणाले की, नगर परीषदेने असा कोणताही कार्यक्रम आयोजीत केला नसून या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना आम्हाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा स्वयंघोषित कारभार तोंडघशी पडला आहे.