शिरुर तालुक्यातील त्या सरपंचांना शिवीगाळ करत चालकाला मारहाण

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांना ग्रामपंचायतच्या वतीने सुरु असलेल्या कामाची पाहणी करुन जात असताना शिवीगाळ, दमदाटी करुन सरपंच महिलेची कार चालवत असलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ बबन गायकवाड, निखील नवनाथ गायकवाड, गणेश नामदेव गायकवाड, मनोहर नामदेव गायकवाड, नंदू कृष्णाजी गायकवाड, छाया नवनाथ गायकवाड, जिजाबाई कृष्णाजी गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या वतीने हिवरे कुंभार ते मांदळवाडी रस्त्याचे रोडवर पुलाचे काम सुरु असून सदर कामाची ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पाहणी करुन सरपंच शारदा गायकवाड या जात असताना गावातील नवनाथ गायकवाड यांनी त्यांची कार अडवून त्यांना दमदाटी करु लागला.

यावेळी सरपंच यांनी तू दारु पिलास येथे काही बोलू नको असे म्हटले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने कार चालवत असलेला शारदा गायकवाड यांचा मावस भाऊ केतन रायकर हा खाली उतरुन शिवीगाळ करु नका, असे म्हटला असता नवनाथ याने त्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवातकेली याच वेळी नवनाथ याच्या घरातील अन्य व्यक्ती व महिला त्या ठिकाणी आल्या त्या सर्वांनी केतन रायकर यास शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करत जखमी केले. दरम्यान सरपंच शारदा गायकवाड यांनी फोन करुन पोलिसांना माहिती दिली असता शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक राकेश मळेकर, अमोल नलगे, विकास मोरे यांनी सदर ठिकाणी जात त्यांना वाद न करण्याबाबत सांगितले.

सदर घटनेमध्ये कार चालक केतन पांडुरंग रायकर हा जखमी झाला असून याबाबत हिवरे कुंभारच्या सरपंच शारदा विकास गायकवाड (वय ३६) रा. हिवरे कुंभार (ता. शिरुर) जि. पुणे सध्या रा. नांदेड सिटी ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नवनाथ बबन गायकवाड, निखील नवनाथ गायकवाड, गणेश नामदेव गायकवाड, मनोहर नामदेव गायकवाड, नंदू कृष्णाजी गायकवाड, छाया नवनाथ गायकवाड, जिजाबाई कृष्णाजी गायकवाड सर्व रा. हिवरे कुंभार (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.

सरपंच गावाला राहायला पुण्याला…

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी एखादा व्यक्ती गावातील राजकारणात सहभागी राहून गावातील राजकारण करतो. मात्र वास्तव्यास पुण्याला असल्याची स्थिती असते त्यामुळे मुख्य पदाधिकारी पुण्याला राहण्यास असल्यास नागरिकांची काही कामे असल्यास त्यांनी काय करताचे अशी स्थिती असताना हिवरे कुंभारच्या सरपंच शारदा गायकवाड सरपंच गावाला मात्र राहायला पुण्याला अशी स्थिती असल्याचे त्यांनी शिक्रापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीतील पत्त्यावरुन स्पष्ट होत आहे.