सावधान! शिरूरमध्ये गोमांसाची सर्रासपणे होतेय विक्री…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कतल केलेले गोमांसांची (गाई कापलेले मांस) सर्रासपणे विक्री होत आहे. याबाबतची माहिती www.shirurtaluka.com ने उघड केल्यानंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गेल्या २ महिन्यांपूर्वी नगर शहरातून शिरूर शहरात सदरचे गोमांस विकणारी टोळी शिरूर तालुका बजरंग दल या संघटनेने पोलिसांना माहिती देऊन जोशीवाडी जवळ पकडून सदरच्या आरोपीना जेरबंद केले होते. परंतु, आज रोजी देखील अनेक नागरिक / गोमांस व्यावसायिक शिरुर शहरात छुप्यामार्गाने शिरुर शहरात गोमांस आणून बेकायदेशीरपणे खुलेआम विक्री करत आहेत.

केंद्रसरकारने यावर कायदा तयार करून सदर चालू असलेले कत्तलखाने व गोमांस विक्रीकरणाऱ्यांवर बंदी आणली असताना देखील विक्री होतीच कसे? व यास कोण पाठीशी घालत आहे? यामागे कोण सूत्रधार आहे? याचा शोध घेऊन सदरचे गोमांस विक्री करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी बजरंग दल शिरूर यांनी केली आहे. सदर विषयी तात्काळ गंभीर दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करून चालू असलेली कत्तल व गोमांस विक्री बंद करावी व गोमांस विक्रीवर पाबंदी आणून प्राणिमात्रांवर दया करावी. गोमांसाच्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

unique international school
unique international school

…अन्यथा गोमांस विक्रेत्यांचा बंदोबस्त आम्हीच करू
शिरूर शहरातील भाजीबाजार परिसरात गोमांस विकणारी दुकाने अस्तित्वात आहेत आणि जवळच पवित्र गुंजोबा देवास्थान आहे. बाहेर गावातून गोमांस आणून या दुकानांमध्ये विकण्यात येते. त्यामुळे आमच्या हिंदू देवस्थानाच्या जवळ असले अनुचित प्रकार घडत आहेत हे आम्ही सहन करणार नाही. येथे राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठया प्रमाणावर त्रास होत आहे. रात्री अपरात्री या लोकांचे या ठिकाणी हे अनुचित प्रकार चालू असतात. काही दिवसांपूर्वीच आपल्या येथे तब्बल 350 किलो पेक्षा जास्त गोमांस पकडण्यात आले. या गोष्टी खूप चिंताजनक आहेत. आम्ही सर्व कायद्याला मानणारे आणि पोलिस प्रशासनावर विश्वास असणारे लोक आहोत तरी पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून या दुकानांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्ही सर्व हिंदू बांधव या गोमांस विक्रेत्यांचा बंदोबस्त करू व त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितस सर्वस्वी पोलिस प्रशासन जबाबदार असेल, असे लेखी पत्र विश्व हिंदू परीषद-बजरंग दल शिरूर यांनी शिरूर पोलिस स्टेशनला दिले आहे.