स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन विविध उपक्रम राबवून साजरा 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे स्वातंत्र्याचा वर्धापनदिन विविध नावीन्यपुर्ण उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. श्री गुरुदेव दत्त विदयालयातील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. ग्रामपंचायत कार्यालयाला समोर ध्वजारोहण सरपंच शुभांगी पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेऊन ग्रामपंचायत ने नवा आदर्श निर्माण केला आहे.

शासनाच्या सूचनेनुसार सलग तीन दिवस शासकीय व निमशासकीय कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. माझी माती माझा देश या उपक्रमा अंतर्गत शीलालेखाचे अनावरण करण्यात आले. ७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. आजी माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आले. दहावी-बारावी परीक्षेत प्रथम ३ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. माजी सरपंच वसंत शेठ पडवळ यांना दैनिक प्रभातच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

सविंदणे गावची कन्या डॉ. कांचन गंगाधर पडवळ हिने (कीटक शास्त्र व प्राणी शास्त्र) या विषया मध्ये PHD पदवी प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ शुभांगी पडवळ होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने अनेक पारंपरिक व देश भक्ती पर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच शुभांगीताई पडवळ यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ग्रामपंचायत च्या वतीने सर्व विद्यार्थी व नागरिकांना स्नेह भोजन देण्यात आले.

यावेळी सरपंच शुभांगी पडवळ, उपसरपंच भोलेनाथ पडवळ, सोनाली खैरे, भाऊसाहेब लंघे, ईश्वर पडवळ, गोरक्ष लंघे, रवी पडवळ, नंदा पुंडे,मनीषा नरवडे, मालूबाई मिंडे, चेअरमन संभाजी पडवळ, बाळासाहेब भोर,अरुणकुमार मोटे रामदास पडवळ आजी माजी सरपंच, आजी माजी सोसायटी चेअरमन व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.