crime

शिरुर तालुक्यात दोन गटात हाणामारी परस्पर विरोधी फिर्याद दाखल

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कर्डेलवाडी (ता. शिरुर ) येथे धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी तसेच दगडाने मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या बाबत राजेंद्र तुकाराम दसगुडे रा.कर्डेलवाडी व अविनाश गोरक्ष फरगडे (वय २९) वर्षे रा. कर्डेलवाडी मेसाई देवीचे मंदिराजवळ ता. शिरुर जि पुणे. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

 

रांजणगाव MIDC पोलीसांनी अविनाश गोरक्ष फरगडे याच्या फिर्यादीनुसार राजेंद्र तुकाराम दसगुडे, अनिल तुकाराम दसगुडे सर्व (रा.कर्डेलवाडी ता शिरूर जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर राजेंद्र दसगुडे यांच्या फिर्यादीनुसार अभिजीत गोरक्ष फरगडे (वय २७) अविनाश गोरक्ष फरगडे (वय ३०) अक्षय अरुण फरगडे (वय २३) सर्व रा.कर्डेलवाडी ता. शिरुर जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की राजेंद्र दसगुडे हे गावातील मीटिंग संपल्याने घरी जात असताना आरोपी अभिजीत गोरक्ष फरगडे, अविनाश गोरक्ष फरगडे, अक्षय अरुण फरगडे यांनी तू वार्ड रचनेबाबतची यादी बनवली ती आमच्या मनाप्रमाणे झाली नाही. असे म्हणून राजेंद्र दसगुडे व त्यांचा भाऊ अनिल तुकाराम दसगुडे यांस लोखंडी गजाने व काठीने मारून तसेच शिवीगाळ,दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

 

तसेच अविनाश गोरक्ष फरगडे याचा भाऊ अभिजित याने ग्रामपंचायत वार्ड रचनेबाबत हरकत घेतल्याच्या कारणावरून अनिल तुकाराम दसगुडे याने त्याच्या हातात दगड घेऊन अविनाश गोरक्ष फरगडे याचा भाऊ अभिजीत याच्या डोक्यात फेकून मारला त्यावेळी अविनाश फरगडे हे मध्ये सोडवण्यासाठी गेले असता राजेंद्र दसगुडे याने त्याच्या हातातील दगड अविनाश दसगुडे याच्या डोक्यात मारून जखमी केले तसेच फरगडे याची आई भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आली असता व तिलाही धक्काबुक्की करून शिवीगाळ, दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

 

या घटनेचा तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस कर्मचारी संजय गायकवाड व राजेश ढगे हे करीत आहेत.