murum-chori

शिरूर तालुक्यात अवैध्य मुरुम, वाळू उपसा; महसुल प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये अवैध्य मुरुम, वाळू उपसा सुरु असून, महसुल प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहे का? अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

शिरूर तालुक्यातील बेट भागात गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी या भागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तातडीने घटनास्थळाचे पंचनामे करुन कारवाई करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील परिसरात गेल्या काही महीन्यांपासून रांत्रदिवस राजरोसपणे मोठया प्रमाणावर वाळू उपसा, मुरुम उपसा व वाहतुक सुरु असून महसुल विभागाचे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

कुंड परीसरासह टाकळी हाजी, शिनगरवाडी, निमगाव दुडे, म्हसे, डोंगरगण या परिसरात अनेक ठिकाणी जेसीबी, पोकलॅनच्या साहाय्याने हा उपसा राजरोसपणे सुरू आहे. टाकळी हाजी व परीसरात सध्या रस्त्यांची, तसेच नवीन बांधकामे सुरु आहे. त्यासाठी अनाधिकृतपणे कुठलीही परवानगी न घेता हजारो ब्रास वाळू उपसा, मुरुम ऊपसा जोरदाररीत्या सुरु आहे.

दरम्यान, बेकायदेशीररीत्या उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्यांचे तातडीने पंचनामे करुन योग्य कारवाई करण्याची मागणी टाकळी हाजी परीसरातून होत आहे.

शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

अवैध व्यवसायांना पोलिसांच संरक्षण; अंबादास दानवे

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात अवैध दारुविक्री जोमात 

अवैध उत्खनन प्रकरणी खाणधारकासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

बेट भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची दिपीका भालेराव यांची मागणी

ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?