स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रांजणगाव MIDC पोलीसांची रक्तदानाची सेंच्युरी…

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन ” रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पोलीस निरीक्षक मांडगे यांनी याबाबत दि.10 ऑगस्ट रोजी महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील, सरपंच यांची बैठक घेवुन त्यांना प्रत्येक गावामध्ये “हर घर तिरंगा” या मोहिमेच्या अनुषंगाने ध्वज संहितेची माहिती देवुन स्वातंत्रदिनी रांजणगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविण्याचे आव्हान केले होते. पोलीस निरीक्षक यांच्या आवाहनास स्थानिक नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केल्याने 101 बाटल्या रक्त संकलित झालं.

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सहायक फौजदार कर्डीले, पोलिस हवालदार संतोष औटी, विजय सरजिने, वैभव मोरे, विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार,पोलिस नाईक माणिक काळकुटे, राजेंद्र वाघमोडे, विनायक मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ हाळनोर, आबासाहेब नाईक, सुरज वळेकर, इतर तसेच पोलीस मित्र नवनाथ पेटे, वैभव तरवडे, साहेबराव हंबरडे यांच्यासह परिसरातील नागरीकांनी असे एकुण 101 व्यक्तींनी रक्तदान केले आहे.

या रक्तदान शिबीरास “मुक्ताई ब्लड सेंटर इंदापुर” यांचा वैद्यकिय स्टाफ डाँ.तेजस मोरे, समाधान देशमुख (सोशल वर्कर),व लँब टेक्निशियन सत्यजित गायकवाड, सुजाता गायकवाड, नामदेव चौरे, विजय भोसले, विकास कांबळे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच रक्तदात्यांना लस्सी,ज्युस,मिल्क इ.ची व्यवस्था “ओनाज डेअरी फार्म”गणेगाव खालसा आणि नाष्टा, फळे यांची व्यवस्था टाटा बँटरीज कंपनी यांनी केली होती. सर्व रक्तदात्यांचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी आभार मानले.