शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. याचाच गैरफायदा घेत शिरुरच्या पुर्व भागातील गुनाट (ता. शिरुर) येथील एका माजी सरपंचांच्या नातेवाईकाने घोड धरणातुन रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर वाळू चोरी करण्याचा सपाटाच लावला असुन त्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

गेल्या वर्षभरापुर्वी सर्वसामान्य जनतेला स्वतः दरात वाळू मिळावी या उद्देशाने शासनाच्या वतीने निमोणे आणि चिंचणी येथे वाळू डेपो उभारण्यात आले. परंतु या दोन्ही वाळू डेपोतुन सर्वसामान्य लोकांना किती ब्रास वाळू स्वस्त दरात मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. उलट या डेपोच्या नावाखाली रात्रंदिवस बेकायदेशीर वाळू उपसा करुन ठेकेदार व स्थानिक वाळूमाफिया मालामाल झाले. हा वाळू ठेक्याचा करार संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराने वाळू उपसा बंद करत असल्याबाबत महसूल विभाला पत्र लिहून कळवले आहे.

 

मात्र त्यानंतर गुनाट येथील माजी सरपंचाच्या नातेवाईकाने सध्या रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर वाळू उपसा करण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे स्थानिक नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महसूल व पोलिस यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत हा वाळूमाफिया सोकावला असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार का…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

 

वाळू माफियासाठी राजकीय नेत्यांची सेटिंग…?

गुनाट येथील माजी सरपंचाची भाजपाच्या काही नेत्यांशी जवळीक आहे. त्यामुळे त्या सरपंचाच्या नातेवाईकाच्या वाळूच्या बोटीवर कारवाई न करण्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी महसूल व पोलिस यांच्याकडे सेटिंग केल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळेच माजी सरपंचाचा नातेवाईक असलेला वाळूमाफिया कोणालाही घाबरत नसल्याचीही चर्चा सुरु आहे.

शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट

व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त

शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात

शिरुर तालुक्यातील तिनही पोलिस स्टेशन हद्दीत ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत DYSP नी घेतली बैठक