शिरुर तालुक्यात पाच वर्षात ना खासदार अमोल कोल्हे गावात आले ना त्यांचा खासदार निधी आला…

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जोरदार प्रचार सुरु असुन शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे हे गेल्या पाच वर्षात शिरुर तालुक्यातील काही गावांचा अपवाद वगळता अनेक गावात फिरकलेच नाहीत. तसेच त्यांच्या खासदार निधीतून एकही रुपयाचे काम अनेक गावात झालेले नाही. त्यामुळे डॉ अमोल कोल्हे हे अभिनेते म्हणुन उत्तम आहेत. मात्र नेते म्हणुन त्यांची कामगिरी मात्र सुमार असल्याचा सुर अनेक गावात पहायला मिळत आहे.

गेल्या पाच वर्षांपुर्वी सलग 15 वर्षे खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत डॉ अमोल कोल्हे यांना मतदारांनी लोकसभेत जाण्याची संधी दिली. मात्र पाच वर्षात कोल्हे यांनी मतदार संघात पुर्णपणे दुर्लक्ष केले. ठराविक अपवाद वगळता अमोल कोल्हे हे अभिनेते असल्यामुळे मालिका, नाटक यांच्या शूटिंग मधेच अडकून पडले. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात त्यांनी किती निधी दिला आणि किती विकासकामे केली हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

अभिनेता नकोयं सुख-दुःखात असणारा नेता हवाय…
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेले 15 वर्षे शिरुर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व केल्याने सहा तालुक्यातील प्रत्येक गावात आढळराव पाटील यांनी अनेकवेळा भेटी दिल्या आहेत. ग्रामीण भागातील मतदारांशी त्यांची नाळ जोडलेली असुन त्यांना कधीही रात्री अपरात्री फोन केला तर ते उचलतात. परंतु डॉ अमोल कोल्हे यांना फोन केल्यास अनेकवेळा तो उचललाच जात नाही अशी सर्वसामान्य लोकांची तक्रार आहे. त्यामुळे आम्हाला सेलिब्रेटी अभिनेता खासदार नकोय तर सर्वसामान्य लोकांच्या व्यथा जाणनारा आणि सर्व सामान्य लोकांच्या सुख-दुःखात सामील होणारा सर्वसामान्य नेता असणारा हवाय असा सुर शिरुर तालुक्यातील मतदारांनी लावला आहे.

शिरुर तालुक्यात खासदार निधी किती…?
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंधरा वर्षात शिरुर तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा खासदार निधी दिला. परंतु डॉ अमोल कोल्हे यांनी शिरुर तालुक्यातील काही ठराविक गावे वगळता कोणत्या गावात किती खासदार निधी दिला हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे डायलॉगबाजी करुन निवडणुक जिंकता येते. परंतु विकासकामे करायला मात्र लोकांच्या समस्या जाणून घेत पाठपुरावाच करावा लागतो अशी सगळीकडे मतदारांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे साडेचार वर्षे काही अपवाद वगळता मतदार संघात ढुंकूनही न पाहणारे डॉ अमोल कोल्हे हे चांगले अभिनेते आहेत, मात्र नेते नाही अशीच सगळीकडे मतदारांमध्ये चर्चा सुरु आहे.

राजकीय सभ्यता जपणारा मावळा; डॉ कोल्हे यांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाबद्दल मतदारांकडुन कौतुक

शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी; 5 वर्ष कुठे होतात??

शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे…?

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

Video; कोल्हेंच्या PA नां MIDC मध्ये यायला वेळ आहे, पण आमची काम करायला वेळ नाही काँग्रेस कार्यकर्त्याची नाराजी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत