शिरुर तालुक्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार, मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शिक्षक कार्यरतच नसल्याचे उघड…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात शिक्षण विभागाचा एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली झाल्याच्या मूळ ठिकाणी कार्यरत नसून बेकायदेशीररीत्या गटशिक्षण आधिकाऱ्याला “लक्ष्मी दर्शन” देऊन तोंडी आदेशाने दुसऱ्याच सोईच्या ठिकाणी काम करत असल्याची शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चांगलीच चर्चा रंगली आहे. हे शिक्षक पगार मात्र मुळ ठिकाणचा घेत आहेत. द्विशिक्षकी शाळा असणाऱ्या शाळेत फत्त एकच शिक्षक मुलांना शिकवत आहे. त्यामुळे विस्तार आधिकारी, गटशिक्षण आधिकाऱ्याची चौकशी करुन तातडीने मुळ ठिकाणी शिक्षकांची नेमणुक करून विदयार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी मनसेचे अविनाश घोगरे यांनी केली आहे.

 

शिरुर तालुक्यातील अनेक शिक्षक वशिला लावून सोईच्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या काम करत आहे. हि अतिशय गंभीर बाब असून शिक्षण विभागातील वरीष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात. याकडे संपूर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसेच अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असल्याचे चित्र असुन अनेक शाळेत शिक्षक वेळेवर येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती नेमकी कशासाठी आहे…? असाही सुर काही पालक काढत आहेत.

(क्रमश:)

भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध; खेड तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द

कवठे येमाईत ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर सापडला

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…