laxmibai-bendra-aamble

शिरूर तालुक्यातील लक्ष्मीबाई बेंद्रे यांचे १०७व्या वर्षी निधन

शिरूर तालुका

शिरूर: शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील लक्ष्मीबाई ऊर्फ ताई शंकरराव बेंद्रे (पाटील) यांचे वयाच्या १०७व्या वर्षी सोमवारी (ता. १८) वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सात मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

संजय बेंद्रे, निलेश बेंद्रे, उत्कर्ष बेंद्रे, शालन लेणे, सुलेचना खंडागळे, सुमन थिटे, डॉ. सीमा सातव, डॉ. विठ्ठल सातव, वंदन मोरे, उद्योजक चंद्रकांत मोरे, बाळासाहेब शेळके या सर्वांच्या त्या ताई होत.

लक्ष्मीबाई शंकरराव बेंद्रे यांचा १ जून १९१९ रोजी तळेगाव ढमढेरे येथे जन्म झाला होता. आंबळे गावचे पाटील शंकरराव बेंद्रे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. जुन्या काळातील जन्म असल्यामुळे त्यांनी इंग्रजांचा काळ पाहिला होता. जुन्या काळातील अनेक आठवणी ते नातवंडांना, पतवंडांना सांगत. दिपाली शेळके यांनी त्यांच्या जीवनावर आधारीत ‘वात्सल्यमूर्ती ताई!’ हे पुस्तक लिहीले असून, ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. संबंधित पुस्तकामध्ये विविध जुन्या काळातील अनेक आठवणींचा आढावा घेण्यात आला आहे.

लक्ष्मीबाई ऊर्फ ताई यांची १०६व्या वर्षीही त्यांची बुद्धी अगदी तल्लख होती. बालपणापासून ते आजपर्यंतची प्रत्येक गोष्ट खडा न खडा त्यांच्या लक्षात होती. शिवाय, त्यांचे दात पण मजबूत आणि जशेच्या तसे होते. १०६व्या वर्षीही त्या ऊस खात होत्या. दरम्यान, आंबळे गावामध्ये बुधवारी (ता. २७) दशक्रियेचा विधी होणार आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.